Kangana Ranaut : कंगनाचा रॉयल अंदाज! नव्या फोटोशूटने वेधले चाहत्यांचे लक्ष
Kangana Ranaut : अशातच या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी कंगनाच्या नव्या फोटोशूटचीही जोरदार चर्चा आहे.

Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत (Kangana Ranaut) सध्या तिच्या ‘भारत भाग्य विधाता’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 12 जूनला हा चित्रपट देशभरातील चित्रपटगृहांमध्ये रिलीज करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची उत्सुकता चाहत्यांना लागली होती. अखेर हा चित्रपट चाहत्यांच्या भेटीला आला आहे.
कंगनाने या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कोणतीही कसर सोडलेली नाही. रिलीजच्या दिवशीच कंगनाच्या ‘भारत भाग्य विधाता’ (bharat bhhagya viddhaata )चित्रपटाला चांगला प्रतिसाद प्रेक्षकांकडून मिळताना दिसत आहे. या चित्रपटातील तिच्या दमदार अभिनयामुळे कंगनाचे कौतुक केले जात आहे.
अशातच या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी कंगनाच्या नव्या फोटोशूटचीही जोरदार चर्चा आहे. चित्रपटाच्या ग्रँड प्रीमियरला हजेरी लावण्यासाठी कंगना जोधपूरमध्ये दाखल झाली होती. तिने उम्मेद भवन पॅलेसला भेट दिली आणि मेहरानगड किल्ल्यातील माँ चामुंडा मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतले. (Kangana Ranaut)
View this post on Instagram
तसेच तिने रतनदा येथील गणेश मंदिरात देशाच्या समृद्धीसाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थनाही केली. या सगळ्यात कंगनाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नव्या लूकचे फोटो शेअर केले आहेत. जे तिच्या चाहत्यांना खूपच आवडले आहेत. या फोटोशूटवर चाहत्यांच्या कौतुकाच्या कमेंट्स येत आहेत. (Kangana Ranaut)
ग्रँड प्रीमियरमध्ये तिने गुजराती स्टाईलमध्ये लाल आणि पांढऱ्या रंगाची प्रिंटेड साडी नेसली होती. कंगनाने या साडीसोबत चोकर नेकलेस आणि कानातले घातले आहेत. तिने केसांमध्ये गजराही माळलेला दिसत आहे, ज्यामुळे तिचा लूक अधिकच खुलून दिसत होता. कंगनाचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसंत केले जात असून, हा तिचा नवा लूक ट्रेंडमध्ये आला आहे. (Kangana Ranaut)
हेही वाचा : Tadap Tadap Ke Song: केके म्हणाले होते, ‘मी हे गाणं गाऊ शकत नाही’; पुढे त्याच गाण्याने रचला इतिहास





