कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ला मिळाला हिरवा कंदील; रिलीज डेट जाहीर

Emergency Release Date | बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावतच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाची रिलीज डेट अखेर कन्फर्म झाली आहे. खुद्द कंगनाने सोशल मीडियावर याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता या चाहत्यांची प्रतिक्षा संपली आहे. कंगनाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’च्या माध्यमातून चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे आणि आता ‘इमर्जन्सी’ चित्रपट पुढील वर्षी 17 जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिली आहे.
कंगनाने या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले असून त्यात चित्रपटाचे मुख्य कलाकारही पाहायला मिळत आहे. तिने एक्सवरील पोस्टमध्ये लिहिले, ‘१७जानेवारी २०२५, देशातील सर्वात शक्तिशाली महिलेची महाकथा आणि भारताचे नशीब बदलणारा क्षण. यावर आधारित ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट १७ जानेवारी २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.‘
17th January 2025 – The epic saga of the nation’s most powerful woman and the moment that altered India’s destiny. #Emergency – Unveils Only in cinemas on 17.01.2025! @KanganaTeam @AnupamPKher #SatishKaushik @shreyastalpade1 #MahimaChaudhry @milindrunning #VishakNair… pic.twitter.com/dC0gnYSNlW
— Kangana Ranaut (@KanganaTeam) November 18, 2024
‘इमर्जन्सी’ हा चित्रपट देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात इंदिरा गांधी सरकारच्या काळात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीचे चित्रण करण्यात आले आहे. या चित्रपटात कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्वत: कंगनाने घेतली आहे.
या चित्रपटात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका श्रेयस तळपदे साकारत आहे. तर अनुपम खेर, जयप्रकाश नारायण, सतीश कौशिक, मिलिंद सोमण आणि महिला चौधरी देखील यात दिसणार आहेत.
कंगनाचा ‘तेजस’ चित्रपट 2023 मध्ये रिलीज झाला होता. त्यानंतर ती दीर्घकाळापासून ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी मोठी मेहनत घेत होती. अखेर हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.





