Kangana Ranaut: “ती कुणाला खूश करण्यासाठी आलेली नाही”; कंगणाने ऐश्वर्याला ट्रोल करणाऱ्यांना सुनावले
Kangana Ranaut: कंगणाने ऐश्वर्या राय-बच्चनच्या समर्थनार्थ इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली

Kangana Ranaut : बॉलीवूड अभिनेत्री व लोकसभा खासदार कंगना राणावत तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असते. सोशल मिडियावरही ती सक्रिय असते. नुकतेच कंगणाने ऐश्वर्या राय-बच्चनच्या समर्थनार्थ इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. ज्यात तिने कान्समधील लूकवरून ऐश्वर्याला ट्रोल करणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत.
कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये ऐश्वर्या राय-बच्चनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी ऐश्वर्याने वेगवेगळे स्टायलिश लूक सादर केले. मात्र, सोशल मीडियावर काही ट्रोलर्सनी तिच्या वाढलेल्या वजनावर आणि वयावरून टीका करत तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. त्यावर कंगनाने ऐश्वर्याचे कौतुक करत तिची बाजू मांडली आहे.
कंगनाची पोस्ट – (Kangana Ranaut)
कंगनाने इन्टाग्राम स्टोरीमध्ये ट्रोलर्सला उत्तर देत लिहिले, “फॅशन आणि स्टाईल म्हणजे स्वतःला व्यक्त करण्याचे एक माध्यम आहे. प्रत्येक जण आपापल्या दृष्टीने आयुष्याकडे बघतो आणि स्वतःची ओळख तयार करतो. कोणत्याही महिलेला दुसऱ्यांसमोर स्वतःला सिद्ध करण्याची काहीही गरज नाही.”
तर ऐश्वर्या रायच्या लूकचे कौतुक करत कंगनाने लिहिले, “ऐश्वर्या खूपच सुंदर दिसते आणि ज्यांना ती अजून वेगळी दिसावी, असे वाटते आहे त्यांनी आधी स्वतःला नीट पाहावे. इथे ती कुणाला खूश करण्यासाठी आलेली नाही. जर रेड कार्पेटवर वयस्कर महिलांना पाहायची सवय नसेल, तर आता ती सवय करून घ्या,” असे स्पष्ट मत कंगनाने व्यक्त केले आहे.
दरम्यान, कंगना सध्या त्यांच्या ‘क्वीन २’या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाचे शूटिंग मुंबईमध्ये सुरू असून, या चित्रपटाच्या शूटिंगसाठी त्यांनी गळ्यात मंगळसूत्र, हातामध्ये हिरवा चुडा, कपाळावर टिकली लावली होती. तिचा हा लुक समोर येताच तिने गुपचुप लग्न केल्याच्या चर्चाही झाल्या. मात्र तिचा हा लुक ‘क्वीन २’ चित्रपटातील आहे. Kangana Ranaut
हेही वाचा:






