कंगना कडाडली : राज कुंद्राच्या डर्टी पिक्चरमुळेच बॉलिवुडचे गटार

मुंबई – उद्योजक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पॉर्न फिल्म चित्रीकरण करुन विकल्याच्या आरोपावरुन मुंबई पोलीस गुन्हे शाखेने अटक केली आहे. मुंबई गुन्हे शाखेने राज कुंद्राची चौकशी केल्यानंतर त्याला अटक केली.
राज कुंद्राच्या अटकेनंतर बॉलिवूडमधील काही अभिनेत्रींनी संताप व्यक्त केला आहे. राज कुंद्राच्या समर्थनार्थ काही अभिनेत्र्यांनी सोशल मीडियावर मत व्यक्त केलं आहे. सतत वादाच्या भोवऱ्यात असलेली अभिनेत्री कंगना राणावतने बॉलिवूडवर निशाणा साधत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. याच कारणामुळे फिल्म इंडस्ट्रीला मी गटार म्हणते अशी संतप्त प्रतिक्रिया कंगनाने दिली आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर कंगनाने बॉलिवूडमधील घराणेशाहीचा चेहरा प्रेक्षकांसमोर आणला होता. यावेळी कंगनाने अनेक निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेत्यांवर निशाणा साधला होता. आता अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्या अटकेनंतर पुन्हा बॉलिवूडवर निशाणा साधत टीका केली आहे.
अभिनेत्री कंगनाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये कंगनाने म्हटलं आहे की, राज कुंद्रा सारखे लोक सातत्याने वादाच्या केंद्रस्थानी असतात. असे डर्टी पिक्चर बनवत असल्याच्या कारणामुळे मी फिल्म इंडस्ट्रीला गटार म्हणते. चमकणारी प्रत्येक गोष्ट ही सोनं नसते, हे लक्षात ठेवणे गरजेचे असते.
मी आगामी प्रोजेक्टमध्ये “टीकू वेड्स शेरू’ या नव्या चित्रपटामधून बॉलिवूडचा खरा चेहरा प्रेक्षकांसमोर आणणार आहे, असे वक्तव्य कंगनाने म्हटले आहे.





