‘पंगागर्ल’ कंगनाने करून दाखवलं ! राष्ट्रीय पुरस्कारावर कोरलं नाव

Updated On:

नवी दिल्ली : पंगागर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री कंगना रनौत सोशल मीडियावर कोणाशीही पंगा घेण्यास घाबरत नाही. त्याचप्रमाणे आपल्या अभिनयासाठी देखील कंगना सर्वांना परिचीत आहे. कंगनाने अभिनयाच्या जोरावर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारवर आपलं नाव कोरलं आहे.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार-2020′ सोहळा राजधानी दिल्लीतील विज्ञान भवनात सोमवारी जल्लोषात पार पडला. या सोहळ्यात अभिनेत्री कंगना रणौत हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. पंगा आणि मणिकर्णिका या चित्रपटात तिनं केलेल्या जबरदस्त अभिनयासाठी तिला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

कंगनासोबतच अभिनेता मनोज वाजपेयी यानं देखील सर्वोत्कृष्ट अभिनेता या पुरस्कारावर आपलं नावं कोरलं. त्याला भोंसले या चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. कंगनावर सध्या शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

६७ व्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांची यादी
बेस्ट इन्वेस्टीगेटीव्ह – जक्कल
सामाजिक हक्कांवर आधारित चित्रपट- होली राईट्स (हिंदी), लाडली (हिंदी)
सर्वोत्कृष्ट पर्यावरण विषयक चित्रपट- द स्टॉर्क सेवियर्स
सर्वोत्कृष्ट अभिनेता (विभागून) – मनोज बाजपेयी (भोसले), धनुष (असूरन)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – कंगना राणौत (पंगा, मणिकर्णिका)
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट- छिछोरे
सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक पसंती) – सोहिनी चट्टोपाध्याय
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – बी. प्राक (तेरी मिट्टी- केसरी)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – सावनी रविंद्र (रान पेटलं – Bardo)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – पल्लवी जोशी (द ताश्कंद फाईल्स)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – विजय सेतुपती (सुपर डिलक्स)

आणखी संबंधित बातम्या

Jaya Bachchan : जया बच्चन यांनी आंदोलनादरम्यान थेट पत्रकाराचा माइकचं ढकलला; कंगणा यांनी साधला निशाणा

2026-10-07 09:35:12

Jaya Bachchan : जया बच्चन यांनी आंदोलनादरम्यान थेट पत्रकाराचा माइकचं ढकलला; कंगणा यांनी  साधला निशाणा

Kangana Ranaut : कंगना रणौत चांदीच्या ग्लासातूनच पाणी का पिते? जाणून घ्या 'हे' जबरदस्त फायदे

2026-09-28 17:21:14

Kangana Ranaut : कंगना रणौत चांदीच्या ग्लासातूनच पाणी का पिते? जाणून घ्या 'हे' जबरदस्त फायदे

Kangana Ranaut : 13 कोटींच्या Rolls-Royce मधून मैथिली ठाकूर लालबागच्या दर्शनाला येताच ट्रोल; कंगना रणौतने ट्रोलर्सना दिलं उत्तर, "काही लोकांचा जळफळाट होतो.."

2026-09-21 15:54:00

Kangana Ranaut : 13 कोटींच्या Rolls-Royce मधून मैथिली ठाकूर लालबागच्या दर्शनाला येताच ट्रोल; कंगना रणौतने ट्रोलर्सना दिलं उत्तर, "काही लोकांचा जळफळाट होतो.."

Dr. Bipin Sule : विश्वकर्मा युनिव्हर्सिटीचे सीईओ डॉ. बिपीन सुळे यांना 'नॅशनल एक्सलन्स अवॉर्ड' प्रदान!

2026-09-21 15:48:07

Dr. Bipin Sule : विश्वकर्मा युनिव्हर्सिटीचे सीईओ डॉ. बिपीन सुळे यांना 'नॅशनल एक्सलन्स अवॉर्ड' प्रदान!

Manoj Bajpayee : मनोज बाजपेयी साकारणार महात्मा गांधींची व्यक्तिरेखा; पहिली झलक समोर

2026-09-06 15:07:10

Manoj Bajpayee : मनोज बाजपेयी साकारणार महात्मा गांधींची व्यक्तिरेखा; पहिली झलक समोर