Kangana Ranaut : कंगनाचा पारा चढला! किचनमधील व्हिडिओ व्हायरल, टोलर्सला चांगलचं सुनावलं
Kangana Ranaut : या व्हिडिओवरून काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं. त्यानंतर कंगनानेही ट्रोलर्सना कडक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.

Kangana Ranaut : भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. कृष्णजन्माष्टमीच्या निमित्ताने तिने सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला होता.
या व्हिडिओवरून काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं. त्यानंतर कंगनानेही ट्रोलर्सना कडक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. कंगना रणौत ही विविध कारणांमुळे सतत चर्चेत असते. तिच्या वक्तव्यांवर सोशल मीडियावर लगेच प्रतिक्रिया उमटतात. याआधीही तिची अनेक वक्तव्ये वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत.
दरम्यान, कृष्णजन्माष्टमीनिमित्त कंगना घरातील स्वयंपाकघरात उपवासाचा पदार्थ तयार करताना दिसत आहे. हा व्हिडिओ तिने तिच्या ‘एक्स’ अकाऊंटवरून शेअर केला आहे. मात्र, व्हिडिओमध्ये ती पदार्थ बनवत असताना गॅसचे बटन बंद असल्याचे दिसत असल्याने काही नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली.
एका ट्रोलरने कंगनाच्या व्हिडिओवर कमेंट करत म्हटलं, “गॅस पेटव, नाटकबाज राणी, आणि बघ तवा किती काळा झाला आहे.”
या टीकेला कंगनाने स्पष्टीकरण देत उत्तर दिलं. “हा साधा हलवा नाही, तर ‘भोग’ आहे. यात अनेक घटक वेगवेगळे तयार करून नंतर एकत्र मिसळले जातात. यानंतर ते सेट होण्यासाठी ठेवले जाते आणि मग त्याचे तुकडे केले जातात,” असं तिने म्हटलं.
Kangana has made bhog for श्री कृष्ण at her parent’s house in Mandi#KanganaRanaut #HappyJanmasthmi pic.twitter.com/p4cfWIZziJ
— Kangana Updates (@KR_Insta2) September 4, 2026
पुढे कंगनाने ट्रोलरला प्रत्युत्तर देताना लिहिलं, “जे आपल्या आई-वडिलांवर आणि पृथ्वीवर ओझे आहेत, त्यांच्याकडून स्वयंपाकाची कला असण्याची अपेक्षा करता येत नाही. फक्त अन्नावर लक्ष केंद्रित करा, स्वयंपाकाची चिंता करू नका.” कंगनाच्या या प्रत्युत्तरानंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.







