Kanchana 4 : ‘कंचना ४’ चित्रपटाची अपडेट समोर; ‘लेडी सुपरस्टार’ अभिनेत्रीची होणार एन्ट्री
Kanchana 4 : नयनताराची भूमिका फ्लॅशबॅक सीनमध्ये

Kanchana 4 : २०११ मध्ये प्रदर्शित झालेला ‘कंचना’ हा सिनेमा सुपरहिट ठरला. यानंतर या चित्रपटाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या भागाला देखील मोठी पसंती मिळाली. आता आता लवकरच कंचना या फ्रॅंचायझीचा चौथा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
सिनेमात राघव लॉरेन्सनेच मुख्य भुमिका साकारली होती. या सिनेमात अभिनयासह दिग्दर्शनही त्यानेच केले होते. सिनेमाने बॉक्स ऑफिसवरही भरघोस कमाई केली होती ‘कंचना ४’ मध्ये अभिनेता राघव लॉरेन्स मुख्य भूमिका साकारणार आहे. सोबतच याया कथेमध्ये एक नवा ट्विस्ट आणण्यासाठी सिनेमाची लेडी सुपरस्टार सज्ज झाली आहे. याआधी चित्रपटात पूजा हेगडे तसेच नोरा फतेही यांची वर्णी लागल्याच्या चर्चा होत्या. परंतु, आता या चित्रपटात आणखी एका लेडी सुपरस्टारची एन्ट्री झाल्याचं बोललं जात आहे. (Kanchana 4)
रिपोर्टनुसार, राघव लॉरेन्सचे दिग्दर्शन आणि अभिनय असलेल्या ‘कंचना ४’ या चित्रपटात नयनतारा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ती चित्रपटाच्या कथेत एक नवा ट्विस्ट आणणार आहे. असे सांगितले जात आहे की, चित्रपटात नयनताराची भूमिका फ्लॅशबॅक सीनमध्ये असू शकते. मात्र, तिच्या भूमिकेबाबत अद्याप फारशी सविस्तर माहिती समोर आलेली नाही. तसेच, अभिनेत्री किंवा निर्मात्यांकडून अजून या वृत्ताला अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. (Kanchana 4)
राघव लॉरेन्सने २०११ मध्ये ‘कंचना’ फ्रँचायझीची सुरुवात केली होती. १५ वर्षांपूर्वी या हॉरर थ्रिलर चित्रपटाला प्रेक्षकांनी प्रचंड पसंती दिली होती. बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट कमालीचा यशस्वी ठरला होता. यानंतर २०१५ मध्ये या चित्रपटाचा सिक्वेल आला आणि त्यानंतर २०१९ मध्ये या फ्रँचायझीचा तिसरा चित्रपट रिलीज झाला. आता या फ्रँचायझीचा चौथा चित्रपट येत आहे, परंतु त्याची रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. (Kanchana 4)
हेही वाचा:
BSNL Recharge Plan: महागड्या रिचार्जला रामराम! BSNLचा ५१ रुपयांचा प्लॅन ग्राहकांसाठी मोठा दिलासा






