“अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली…” ; कन्नड भाषेच्या वादावरून कमल हासनला न्यायालयाने फटकारले

Kamal Haasan Kannada Row । कन्नड-तमिळ भाषेवरून सुरू असलेल्या वादात अभिनेता कमल हासन यांना कर्नाटक उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे. “अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकत नाहीत,” असे म्हणत उच्च न्यायालयाने कमल हासनला चांगलेच सुनावले आहे. कमल हासन यांनी कन्नड आणि तमिळ भाषांबाबत विधान केले होते. यानंतर खूप वाद झाला, जो अजूनही थांबलेला नाही. कमल हासनचा ‘ठग लाईफ’ हा चित्रपट ५ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपटही वादांनी वेढलेला आहे.
Karnataka High Court hears petitions seeking directions to authorities on release of Kamal Hassan’s ‘Thug Life’
Read @ANI Story | https://t.co/tF0NWWhbzf#ThugLife #HCPetition #KamalHaasan pic.twitter.com/8uSggFFuCk
— ANI Digital (@ani_digital) June 3, 2025
तुम्ही जनतेच्या भावना दुखवू शकत नाही Kamal Haasan Kannada Row ।
कमल हासन यांनी अलीकडेच त्यांच्या आगामी ‘ठग लाईफ’ चित्रपटाच्या ऑडिओ लाँच दरम्यान सांगितले होते की कन्नड भाषेची उत्पत्ती तमिळ भाषेतून झाली आहे. यावर वाद निर्माण झाला आणि प्रकरण इतके वाढले की ते न्यायालयात पोहोचले. कर्नाटक उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती एम. नागाप्रसन्ना यांच्या खंडपीठाने अभिनेत्याला फटकारले. समोर आलेल्या वृत्तानुसार, उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, “तुम्ही कमल हासन असोत किंवा इतर कोणी, तुम्ही जनतेच्या भावना दुखवू शकत नाही. तुम्ही स्वतःच या परिस्थितीचे कारण आहात.” अभिनेते कमल हासन यांनीही या प्रकरणी माफी मागण्यास नकार दिला. त्यांनी म्हटले आहे की,”हे विधान एकता वाढवण्याच्या उद्देशाने देण्यात आले आहे.”
“जर कन्नड लोकांची गरज नसेल तर…” Kamal Haasan Kannada Row ।
कमल हासन यांच्या ‘ठग लाईफ’ या नवीन चित्रपटाच्या उत्पन्नाचा (कमाईचा) संदर्भ देत, कोर्टाने म्हटले की, “तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, पण भावना दुखावण्याचा नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली, ते इतक्या प्रमाणात दिले जाऊ शकत नाही की ते जनतेच्या भावना दुखावतील. आम्ही आता ते तुमच्यावर सोडत आहोत. जर तुम्ही कोणाला दुखावले असेल तर माफी मागा. कर्नाटकातून करोडो रुपये कमवता येतात. जर तुम्हाला कन्नड लोकांची गरज नसेल तर येथून कमावणे थांबवा.”असे म्हणत न्यायालयाने कमल हासन यांना खडेबोल सुनावले.





