दक्षिणेचे राजकारण तापले ! कमल हासन सक्रीय झाल्याने प्रचारात रंगत.. लाखोंची गर्दी उसळली

Kamal Haasan active in Politics : विख्यात दाक्षिणात्य अभिनेते, निर्माते कमल हासन वर्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सक्रीय झाल्याने दक्षिण भारतात प्रचारात रंगत आली आहे. लाखो चाहत्यांच्या उपस्थितीने प्रचार फेरी आणि राजकीय सभांना गर्दी होताना दिसत आहे.
कमल हसनचे दोन चित्रपट सध्या मुंबईत चर्चेत आहेत. मतदानाचा निकाल येण्यापूर्वी त्याचा ‘कल्की २८९८ एडी’ हा चित्रपट प्रदर्शित होईल आणि त्यानंतर त्याच्या बहुचर्चित ‘इंडियन २’ या चित्रपटाचा सिक्वेल येणार आहे. या दोन्ही चित्रपटांना हिंदी भाषिक भागात मोठी मागणी आहे आणि उत्तर भारतात या दोन चित्रपटांचे वितरण करण्यासाठी मुंबईतील अनेक चित्रपट वितरक सतत व्यवसायिक चर्चा करत आहेत. कमल हासन यांना राजकारणात प्रचंड रस आहे. २०१८ मध्ये त्यांनी पहिल्यांदा सक्रिय राजकारणात प्रवेश केला. | Kamal Haasan active in Politics
काल रात्री, कमल हसन पहिल्यांदाच या लोकसभा निवडणुकीत द्रमुकचे उमेदवार डी रविकुमार यांच्या प्रचारासाठी बाहेर पडले. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या प्रचारादरम्यान कमल हसन हात जोडून रविकुमार यांच्यासाठी मते मागताना दिसले. | Kamal Haasan active in Politics
பெரம்பலூர் பாராளுமன்றத் தொகுதியின் திமுக வேட்பாளர் @ArunNehru_DMK அவர்களுக்காக பரப்புரை மேற்கொண்டேன். நகர்ப்புற வளர்ச்சித் துறை அமைச்சர் மாண்புமிகு @KN_NEHRU அவர்களும் என்னோடு வந்திருந்தார்.
ஒன்றிய அரசின் ஓரவஞ்சனைகளையும் மீறி, இந்திய மாநிலங்களில் தமிழ்நாடு முன்னிலை வகிப்பதை… pic.twitter.com/WZSg4Ug3yF
— Kamal Haasan (@ikamalhaasan) April 3, 2024
२०१९ च्या निवडणुकीत कमल हासनच्या पक्षाने ३७ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते आणि त्यापैकी एकही जिंकू शकला नसला तरी या निवडणुकांमध्ये द्रमुकच्या समर्थनार्थ येण्याचा परिणाम निवडणूक निकालांवर होऊ शकतो. एकूण मतांच्या अर्धा टक्काही पक्षाला मिळू शकला नव्हता. | Kamal Haasan active in Politics





