Kalyan Banerjee on Mahua Moitra। तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी आणि महुआ मोइत्रा यांच्यातील शाब्दिक युद्ध काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. कल्याण बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा पक्षाच्या नेत्या महुआ मोइत्रा यांच्यावर कठोर टिप्पणी केली आहे. “ती महिला माझ्या बोलण्याचा भाग नाही” आणि ती “खूप खालच्या दर्जाची” आहे. बॅनर्जी यांनी,त्यांच्याबद्दल बोलणे म्हणजे वेळ आणि शक्तीचा अपव्यय आहे.” असे म्हणत कडक शब्दात टीका केली. त्यांनी पुढे बोलताना,”एकेकाळी महुआ मोइत्रामुळे ते खूप रागावले होते आणि त्यांनी “दीदी (ममता बॅनर्जी)” यांनाही काही गोष्टी सांगितल्या होत्या. मात्र, आता त्यांना पश्चात्ताप होत आहे. ते वेळ आणि शक्तीचा अपव्यय होते. बॅनर्जी यांनी,”एका कनिष्ठ वकिलाच्या संदेशाने या प्रकरणावरील त्यांचे विचार बदलले. ते म्हणाले, “आता मला असे वाटते की मी माझा वेळ आणि शक्ती वाया घालवली. त्या मी लक्ष द्याव्यात एवढ्या लायकीच्या नाहीत. मी त्यांच्याकडे लक्ष देऊन चूक केली. आता मला हे समजले आहे.” असे म्हणत जोरदार हल्लबोल चढवला. कल्याण बॅनर्जी यांच्या या विधानामुळे, तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष अधिक उघडपणे समोर आला आहे. कल्याण बॅनर्जी यांचे लोकसभेत तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्याशी दीर्घकाळापासूनचे भांडण आहे. दोन्ही नेत्यांनी अनेक वेळा एकमेकांवर उघडपणे टीका केली आहे. पॉडकास्टमुळे शब्दयुद्ध सुरू Kalyan Banerjee on Mahua Moitra। अलीकडील पॉडकास्ट मुलाखतीनंतर, महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जी यांच्यात तीव्र शब्दयुद्ध सुरू झाले. महुआ मोईत्रा यांनी त्यांच्या मुलाखतीत कल्याण बॅनर्जींवर हल्ला चढवत म्हटले की, “तुम्ही डुकराशी कुस्ती करू शकत नाही, कारण डुकराला चिखल आवडतो आणि तुम्ही घाणेरडे व्हाल.” त्या पुढे म्हणाल्या की, भारतात “अत्यंत महिलाद्वेषी, लैंगिकदृष्ट्या निराश, भ्रष्ट पुरुष” आहेत आणि असे लोक संसदेत प्रत्येक पक्षात आहेत. या विधानानंतर कल्याण बॅनर्जी यांनी प्रत्युत्तर देत म्हटले की, “मी महुआ मोईत्रा यांनी अलिकडच्या पॉडकास्टमध्ये केलेल्या वैयक्तिक टिप्पण्यांची दखल घेतली आहे.” तिने शब्दांची निवड केली आहे, ज्यामध्ये एका सहकारी खासदाराची तुलना ‘डुक्कर’शी करणे अशा भाषेचा वापर समाविष्ट आहे, हे केवळ दुर्दैवी नाही तर ते सुसंस्कृत संवादाच्या मूलभूत नियमांचे खोलवर उल्लंघन देखील दर्शवते. Kalyan Banerjee on Mahua Moitra।