चिंबळी : खेड तालुक्यातील अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाजाच्या अध्यक्षपदी चिंबळी (ता. खेड) येथील सामाजिक कार्यकर्ते कालिदास हनुमंत खंडागळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विद्यानंदजी माणिकराव मानकर आणि संघाचे अध्यक्ष दत्तात्रय सुतार यांनी ही माहिती दिली. निवड प्रक्रियेनंतर आयोजित सत्कार समारंभात चिंबळी ग्रामस्थ आणि सुतार समाजाच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष कालिदास खंडागळे यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी माजी अध्यक्ष चंद्रकांत कदम, रमेश सुतार, भगवान सार्दे, किशोर कदम, बाळासाहेब टकले, भरत भालेराव, दिलीप आनंदे, रेश्मा केदारी, गुलाब खंडागळे, राजू खंडागळे, गोविंद खंडागळे, अमर गायकवाड, कुमार गायकवाड, शिवाजी भालेकर, हनुमंत खंडागळे, शीमा खंडागळे यांच्यासह महिला वर्ग आणि अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनिर्वाचित अध्यक्ष खंडागळे यांनी समाजाच्या विकासासाठी आणि एकजुटीसाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. हा कार्यक्रम चिंबळी येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.