Kalicharan Maharaj : कालीचरण महाराजांनी मराठा आंदोलक मनोज जरांगेबद्दल केले ‘हे’ वादग्रस्त वक्तव्य

छत्रपती संभाजीनगर : नेहमी आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असणाऱ्या कालीचरण महाराजांनी मराठा आंदोलक मनोज जरांगेबद्दल नुकतेच एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. हिंदुत्व तोडायला निघालेला राक्षस म्हणजे मनोज जरांगे अशी टीका कालीचरण महाराजांनी केली आहे.
काय म्हणाले कालीचरण महाराज ?
हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे इकडे एक आंदोलन सुरू होते. त्या आंदोलनाची खूप जोरदार हवा होती. मुंबईत तुफान गर्दी झाली होती. त्यांच्या नेत्याने दर्ग्यावर जाऊन चादर चढवली. जातीवरुन आरक्षण मागत होता. आरक्षण वगैरे नाही, त्याला हिंदुत्व तोडायचे होते. हिंदुत्व तोडायला निघालेला हा राक्षस आहे… असे वादग्रस्त वक्तव्य कालीचरण महाराज यांनी केले.
तसेच दर पाच वर्षांनी निवडणूक होते आणि मतदानातून राजा ठरतो. राजा कसा असला पाहिजे, हे ठरवण्याचा अधिकार मतदारांचा आहे. मात्र भाजी आणि पेट्रोलच्या किंमतीसाठी मतदान करू नका. हिंदूंनो मोठ्या संख्येने धर्म वाचविण्यासाठी मतदान करा. तुम्ही लोक मतदानाला जात नाहीत. मग राजा कोण होणार, मुस्लिमांचे तळवे चाटणारा राजा होतो, असेदेखील कालीचरण महाराज म्हणाले.
काँग्रेसकडून कालीचरण महाराजांच्या वक्तव्याचा निषेध
मराठा आरक्षणासाठी लढणारे योद्धे मनोज जरांगे पाटील यांना राक्षस म्हणणाऱ्या कालीचरण यांचे वक्तव्य चुकीचे व निषेधार्ह आहे. कालीचरण यांची पाठीराखी महायुतीचा जाहीर निषेध! अशी टीका काँग्रेसने केली आहे.





