पुणे जिल्हा | कुस्तीसाठी कळंबचे नाव भविष्यात उज्वल होईल- दिनेश गुंड

मंचर, (प्रतिनिधी) – कळंब गावचे नाव कबड्डीच्या स्पर्धेसाठी उज्वल झाले आहे. तसेच कुस्तीसाठी कळंबचे नाव भविष्यात उज्वल होईल. कुस्ती स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील तरुणांना राष्ट्रीय खेळाडू होण्यासाठी महत्वपूर्ण मदत होते, असे मत कुस्ती स्पर्धेचे राष्ट्रीय पंच दिनेश गुंड यांनी व्यक्त केले.
कळंब (ता.आंबेगाव) येथे महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाकडून येत्या ५ व ६ ऑक्टोंबर रोजी वीस वर्षाखालील युवा फ्रीस्टाइल व ग्रिकोरोमण राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आयोजन करण्यात आले आहे.
त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाकडून कुस्ती स्पर्धा आयोजन करण्याबाबतचे परवानगी पत्र आंतरराष्ट्रीय पंच दिनेश गुंड यांच्या हस्ते आंबेगाव तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष नितीन भालेराव यांना कळंब येथे सुपूर्द करण्यात आले.
यावेळी पुणे जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे पदाधिकारी व आंतरराष्ट्रीय पंच नवनाथ घुले, मारुती सातव, कैलास गुंड ,शेखर यादव,आंबेगाव तालुका उपाध्यक्ष शांताराम काळे, सचिव जयवंत गाडे, पैलवान भूषण बारवे,
पैलवान शरणानंद सदावर्ते,शरद गाडे, युवराज मोढवे,नवनाथ भालेराव, विलास टेमगिरे,आदित्य रायकर,जुन्नर तालुका कुस्तीगीर संघ सचिव विलास कदम,पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ सदस्य राजेंद्र पाबळे,
कुस्ती पंच धोंडीबा पाबळे,युवा सेना समन्वयक रोहन कानडे,शिवसेना शाखाप्रमुख हर्षल भालेराव,उपाध्यक्ष कुमार भोकसे, उपाध्यक्ष प्रमोद पिंगळे, सुमित वर्पे,सोसायटी संचालक नितीन थोरात,शुभम भालेराव,शंकर कहडणे,लालू मंडलिक, दत्ता भालेराव यांच्यासह अनेक मान्यवर व पैलवान मंडळी व कुस्तीगीर संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
सुमारे ६०० पैलवानांची हजेरी
आंबेगाव तालुक्यात कळंब या ठिकाणी पहिल्यांदाच मॅटवरील एवढ्या मोठ्या स्पर्धा होत असून या स्पर्धेत ५५० ते ६०० पैलवान सहभागी होतील. असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.





