Maa Box Office Collection | बॉलिवूड अभिनेत्री काजोलचा ‘माँ’ चित्रपट रिलीज झाला आहे. हा चित्रपट एका आई आणि मुलीच्या संघर्षावर आधारित आहे. यात मुख्य भूमिकेत काजोल झळकली आहे. तर खलनायकाची भूमिकेत रोनित रॉय दिसत आहे. याशिवाय चित्रपटात इंद्रनील सेनगुप्ता पाहायला मिळाला आहे. ज्याने काजोलच्या नवऱ्याची भूमिका साकारली आहे. यात राक्षस आणि देवी काली मातेची कथा सांगण्यात आली आहे. सध्या ‘माँ’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने तीन दिवसांत 17.40 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. ‘माँ’ चित्रपट आता लवकरच 20 कोटींचा टप्पा पार करणार आहे. काजोलच्या ‘माँ’ चित्रपटाने पहिल्या आठवड्यात अनेक चित्रपटांना मागे टाकले आहे. Maa Box Office Collection | विशाल फुरियाने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. यामध्ये खेरीन शर्माने काजोलच्या मुलीची भूमिका साकारली असून तिनेही उल्लेखनीय काम केलं आहे. तर सुरजसिखा दास या नव्या अभिनेत्रीने सुद्धा उत्तम काम केले आहे. Maa Box Office Collection | हेही वाचा: ‘आम्हाला एक चांगला, सुंदर करार करायला..’ ; भारत-अमेरिका करारावर निर्मला सीतारमण यांचे मोठे विधान, GST विषयी दिले ‘हे’ संकेत