काजोलने टोचले पापाराझींचे कान! जया बच्चन यांच्यासोबत केलेल्या तुलनेवर अभिनेत्री भडकली थेट म्हणाली आधी….

Actress Kajol : अभिनेत्री काजोल हिचा बहुचर्चित माँ हा चित्रपट २७ जून रोजी रिलीज होणार आहे. यामुळे अभिनेत्रीकडून चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले जात आहे. मोठ्या पडद्यावर आपल्या सहज सुंदर अभिनयाने काजोलने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. पण अॅाफ स्क्रिन मात्र, ती रागीट आणि भीतीदायक असल्याचे टॅग तिच्याशी जोडले जात आहे.
एवढेच नव्हे तर पापाराझींसोबत तिचे वर्तन चांगले नाही, असे देखील बोलले जात आहे. अशातच आता काजोलची तुलना ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांच्यासोबत केली जात आहे. यावर काजोल भडकली असून तिने पापाराझींचे कान टोचत यावर प्रतिक्रिया दिली आहे.
जया बच्चन यांनी अनेकदा पापाराझींवर टीका केली आहे. जयाप्रमाणेच काजोलनेही पापाराझींवर आपला राग काढला आहे, असे पापाराझींकडून बोलले जात आहे. काजोल म्हणते की, पापाराझी जाणूनबुजून तिला भडकावतात आणि काहीतरी बोलण्यासाठी दबाव आणतात. झूमशी बोलताना ती म्हणाली, “ठीक आहे, जर तुम्हाला वाटत असेल की मी भितीदायक आहे. तर कृपया ‘माँ’ चित्रपट पाहण्यासाठी जा, असे ती म्हणाली आहे.
पहिल्यांदाच हॅारर चित्रपट
९० च्या दशकातील ब्युटी क्वीन काजोल पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एका हॉरर चित्रपटात दिसणार आहे. तिचा आगामी हॉरर चित्रपट ‘माँ’ हा २७ जून २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट तिचा पती अजय देवगणच्या प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली तयार करण्यात आला आहे.
हेही वाचा : दीपिकाच्या आठ तास काम करण्याच्या मागणीवर सोनाक्षीने व्यक्त केली भूमिका





