Bollywood News | अनेक बॉलीवूड कलाकारांनी पापाराझींच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केली आहे. यातच आता अभिनेत्री काजोलने देखील उघडपणे एका मुलाखतीत पापाराझींच्या वागण्याला विचित्र आणि अपमानजनक असल्याचं म्हटले आहे. काजोलने एका मुलाखतीत सांगितले, “पापाराझी सतत सतत पाठलाग करतात हे खूपच त्रासदायक आहे. मी पापाराझी संस्कृतीबाबत थोडी सावध असते. मला वाटते, काही ठिकाणी त्यांनी नसावे. उदाहरणार्थ, जेव्हा ते कोणाच्या अंत्यसंस्कारात अभिनेत्यांच्या मागे धावतात आणि फोटो मागतात, तेव्हा मला ते खूप विचित्र आणि काहीसे अपमानजनक वाटते. साधं जेवायला देखील जाऊ शकत नाही, हे मला विचित्र वाटते.” काजोल पुढे म्हणाली, “पापाराझी जुहूपासून बांद्रापर्यंत कित्येक किलोमीटर तुमचा पाठलाग करतात, मी कुठे जात आहे आणि कोणत्या इमारतीत प्रवेश करत आहे हे पाहण्यासाठी. मला हे त्रासदायक वाटते. जर मी सामान्य व्यक्ती असती, तर तुम्ही असे केले असते का? मी तुम्हाला पोलिसांकडे घेऊन सांगितले नसते का की हा माणूस माझा पाठलाग करतोय? पण आता मी पोलिसांना काय सांगणार?”. Bollywood News | पापाराझी संस्कृतीत काय बदल करायला हवे, असे काजोलला विचारले तेव्हा तिने, काही ठिकाणी ते नसावेत. त्यांचा सतत पाठलाग करणं मला ते अनादरपूर्ण आणि विचित्र वाटतं असल्याचे सांगितले. Bollywood News | यापूर्वी आलिया भट्टने घरी फोटो काढल्याबद्दल पापाराझींना फटकारले होते. यासारखे अनेक कलाकार आहेत की, जे पापाराझींच्या वागणुकीमुळे त्रस्त झाले आहेत. दरम्यान, काजोल सध्या तिच्या ‘माँ’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. विशाल फुरिया दिग्दर्शित आणि देवगण फिल्म्स निर्मित हा चित्रपट 27 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. Bollywood News |