“आम्ही ठाकरेंमुळे आमदार झालोय, त्यांच्यासोबत आमची…” ; ठाकरेंच्या ‘या’ शिलेदारांचे स्पष्टीकरण

Kailash Patil on Uddhav Thackeray । राज्यात मागील काही दिवसांपासून मोठा राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यातच धाराशिवमध्ये मोठे बदल लवकर होणार असल्याचे संकेत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले होते. त्यामुळे येत्या काळात शिवसेना ठाकरे गटाची खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकणार असल्याच्या बातम्या सर्वत्र पसरल्या होत्या. याच चर्चांवर आता आमदार कैलास पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. कैलास पाटलांनी ही चर्चा फेटाळत सत्ता गेली म्हणजे आम्ही पक्ष सोडणार नाही, असे सांगितले.
आम्ही कालही ठाकरेंसोबत होतो आणि उद्याही ठाकरेंसोबत असू Kailash Patil on Uddhav Thackeray ।
मागील काही दिवसांपासून राज्यात सुरु असणाऱ्या राजकीय भूकंपावर कैलास पाटील यांनी भाष्य केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना कैलास पाटील यांनी,”ठाकरे गटात कुठेही अस्वस्थता नाही. आम्ही कालही ठाकरेंसोबत होतो आणि उद्याही ठाकरेंसोबत असू असं कैलास पाटील यांनी सांगितले.
प्रताप सरनाईकांच्या ‘त्या’ विधानाने चर्चांना उधाण
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने रविवारी पालकमंत्री प्रताप सरनाईक धाराशिवमध्ये आले होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यात ‘ऑपरेशन टायगर’ राबवण्याचे संकेत दिले होते. धाराशिव जिल्ह्यात बदल झाला तर विशेष वावगे वाटायला नको, असं सूचक वक्तव्य त्यांनी केले होते. भविष्यामध्ये तुम्ही बघाल पुढे पुढे काय होत आहे. विधानसभेच्या निवडणुकीत या राज्यातील जननेते दाखवून दिलं आहे की, खरी शिवसेना कोणाची आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यात बदल झाला तर आश्चर्य वाटून घेऊ नका, अशा आशयाचे वक्तव्य सरनाईक यांनी केले होते.
आम्ही ठाकरेंमुळे आमदार झालोय Kailash Patil on Uddhav Thackeray ।
त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील ठाकरे गटाचे कोणते नेते एकनाथ शिंदेंच्या गळाला लागणार, याची चर्चा सुरु झाली होती. यामध्ये खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार प्रवीण स्वामी आणि आमदार कैलास पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर कैलास पाटील यांनी आम्ही ठाकरेंची साथ सोडून कुठेही जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. ठाकरे गटात कोणतीही अस्वस्थता नाही. सरकार आल्यापासून जिल्ह्यातील काही लोकांच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता महाराष्ट्राला दिसत आहे. आमची निष्ठा कालही उद्धव ठाकरेंसोबत होती आजही आहे आणि उद्याही राहणार. शिवसैनिक आणि ठाकरेंमुळे आम्ही आमदार असल्याची जाणीव आम्हाला असल्याचे कैलास पाटील यांनी सांगितले.





