के. एल. राहुलवरील शस्त्रक्रिया यशस्वी
Updated On:

नवी दिल्ली -आयपीएलच्या 16 व्या मोसमात कर्णधार के. एल. राहुल दुखापतीमुळे संघाबाहेर पडल्याने लखनौ सुपर जायंट्सला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर राहुलने आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या मांडीवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. 1 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना राहुलला दुखापत झाली होती.
राहुलने शस्त्रक्रियेनंतर शेअर केलेल्या नोटमध्ये लिहिले की, “माझी शस्त्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे, जी यशस्वी झाली आहे. मी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानू इच्छितो, ज्यांच्यामुळे मला पुन्हा आराम वाटत आहे. आता मी रिकव्हरीवर लक्ष केंद्रित करेन, जेणेकरून मला लवकरच मैदानावर परतता येईल.’ दरम्यान, यंदाच्या आयपीएल हंगामात राहुलची बॅट अपेक्षेप्रमाणे चाललेली नाही.





