BRS नेत्या के. कविता यांना दिलासा नाहीच! जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

K. Kavitha Bail Plea| दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले बीआरएस नेत्या के. कविता यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. के. कविता यांनी अंतरिम जामीनासाठी केलेला अर्ज राऊस अव्हेन्यू कोर्टाने सोमवारी फेटाळला आहे. के. कविता यांनी याचिकेत त्यांच्या16 वर्षांच्या मुलाची परीक्षा असल्याचे सांगत कोर्टात अंतरिम जामीन मंजूर करण्याची विनंती केली होती.
बीआरएस नेत्याच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, के. कविता यांच्या मुलाच्या परीक्षा एप्रिल महिन्यात आहेत. 16 वर्षांच्या मुलाला परीक्षेच्या काळात आईच्या आधाराची गरज असते. हा आईचा तिच्या मुलासाठी नैतिक आणि भावनिक आधाराचा मुद्दा आहे. भाऊ किंवा वडील दोघेही आईची अनुपस्थिती पूर्ण करू शकत नाहीत, अशा परिस्थितीत त्यांना अंतरिम जामीन मंजूर करावा. कारण के. कविता यांच्या अटकेमुळे मुलावर आधीच मानसिक आघात झाल्याचा युक्तीवाद करण्यात आला.
यावर सुनावणीदरम्यान ईडीच्या वतीने वकील जोहेब हुसैन यांनी सांगितले की, कविता ही या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. तपास यंत्रणा या प्रकरणात यश मिळविण्याच्या मार्गावर आहे आणि कविताला अंतरिम जामीन दिल्याने तपासात अडथळा येईल. कविताच्या मुलाच्या 12 पैकी 7 परीक्षा झाल्या आहेत. तो एकटा नाही, कारण त्याचे वडील आणि मोठा भाऊही त्याच्यासोबत असल्याचे म्हंटले. K. Kavitha Bail Plea|
दरम्यान, 4 एप्रिल रोजी कविता यांच्या जामीन अर्जावर दिल्लीच्या राउज एवेन्यू कोर्टात सुनावणी पार पडली होती. सुनावणी पुर्ण झाल्यानंतर कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. आज कोर्टाने याप्रकरणाचा निकाल दिला असून के. कविता यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.
के. कविता यांच्यावर कोणता आहे आरोप? K. Kavitha Bail Plea|
दरम्यान, मद्य धोरण प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ED ने के यांना 15 मार्च रोजी हैदराबाद येथून अटक केली होती. तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची कन्या कविता यांनी दिल्लीच्या आम आदमी पार्टीला दारूच्या परवान्यासाठी 100 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप आहे. कविता यांनी अंतरिम जामिनासाठी अनेकवेळा याचिका दाखल केल्या आहेत, परंतु त्यांना अद्याप कोणताही दिलासा मिळालेला नाही. त्या १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत असणार आहेत.
हेही वाचा:





