आयएनएस अरिघाटातून के-4 क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी; जाणून घ्या खासियत..

K4 Ballistic Missile | भारतीय नौदलाने के-4 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. नुकत्याच नौदलात सामील झालेल्या आयएनएस अरिघाट या आण्विक पाणबुडीवरून के-4 क्षेपणास्त्राची ही चाचणी घेण्यात आली होती. आयएनएस अरिघाट ही आण्विक पाणबुडी स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडद्वारे चालवली जाते. चीननंतर पाणबुडीतून अण्वस्त्रांनी हल्ला करणारा भारत हा आशियातील दुसरा देश ठरला आहे.
के-4 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची रेंज 3500 किमी आहे. त्यामुळे नौदलाची ताकद प्रचंड वाढेल. आयएनएस अरिघाट एकावेळी 12 के-15, चाके-4 आणि 30 टॉर्पेडोने सज्ज असू शकते. पाणबुडीवरून के-4 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची ही पहिली यशस्वी चाचणी आहे. K-4 SLBM क्षेपणास्त्राचे वजन 17 टन आहे. त्याची लांबी 39 फूट, व्यास 4.3 मीटर आहे.
ते 2500 किलोपर्यंतचे अण्वस्त्र भार सहज वाहून नेऊ शकते. यात घन रॉकेट मोटर आणि घन प्रणोदक आहे. हे क्षेपणास्त्र अरिहंत श्रेणीच्या पाणबुड्यांमध्ये तैनात करण्यात आले आहे. या पाणबुड्यांमध्ये चार उभ्या प्रक्षेपण प्रणाली आहेत, ज्यातून K-4 लाँच करता येते.
तर पुढील वर्षी आणखी एक आण्विक पाणबुडी आयएनएस अरिदमन देखील भारतीय नौदलात सामील होणार आहे. आयएनएस अरिद्मन, के-4 आणके-5 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असेल. के-5 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची रेंज आणखी जास्त म्हणजे 5000 किलोमीटरपर्यंत आहे.
चिनी परिसर अण्वस्त्रांच्या रेंजमध्ये
भारताच्या आण्विक क्षमतेसाठी ही चाचणी अत्यंत महत्त्वाची असून आता भारत समुद्रातूनही लांब अंतरावर आण्विक हल्ला करण्यास सक्षम झाला आहे. नौदलाच्या के-4 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे चीनचा बहुतांश भाग आता भारताच्या अण्वस्त्रांच्या रडारखाली आला आहे.
नौदलाने बंगालच्या उपसागरात या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. भारताची पहिली आण्विक पाणबुडी, आयएसएस अरिहंत, के-15 क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे, परंतु त्यांचा पल्ला फक्त 750 किलोमीटर आहे. आता आयएनएस अरिघाटावरून के-4 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्याने चीनविरुद्ध भारताची ताकद वाढली आहे.
हेही वाचा:





