Justice Markandey Katju। भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी टीका केली आहे. त्यांनीसोशल मीडियावर दोन पोस्ट केल्या आहेत. यातून त्यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी,”लवकरच आपण लाहोरमध्ये नाश्त्यात बेकन आणि अंडी खाऊ, इस्लामाबादमध्ये दुपारच्या जेवणात बिर्याणीचा आस्वाद घेऊ, पेशावरमध्ये चहासोबत डोनट्स खाऊ आणि कराचीमध्ये रात्रीच्या जेवणात सीफूड चाखू.” असे म्हटले आहे. सध्या त्यांच्या या विधानाची सर्वत्र मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. दुसऱ्या एका फेसबुक पोस्टमध्ये, सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांनी, “आम्ही लाहोरचे नाव ‘लव्ह नगर’ (लाहोरवाल्याला खूश करण्यासाठी), कराचीचे ‘नवीन काशी’, पेशावरचे ‘पेशवे नगर’ आणि क्वेटाचे ‘कृष्ण नगर’ असे ठेवू.” असे म्हटले आहे. पाकिस्तान भारताला सतत युद्धासाठी चिथावणी देत असताना आणि ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न करत असताना न्यायमूर्ती काटजू यांचे हे विधान आले आहे. पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्याला भारताने दिले प्रत्युत्तर Justice Markandey Katju। गुरुवारी रात्री पाकिस्तानने ड्रोनने १५ भारतीय लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, ज्याला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले. भारताने ५० हून अधिक पाकिस्तानी ड्रोन पाडले. यानंतर, पाकिस्तानी सैन्यानेही नियंत्रण रेषेवर गोळीबार केला, ज्याला भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युत्तर दिले. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला Justice Markandey Katju। २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांची गोळ्या घालून हत्या केली होती. यानंतर, भारताने प्रत्युत्तर देत पाकिस्तानमधील 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. पाकिस्तानने आरोप केला की भारताने नागरिक आणि निष्पाप मुलांना लक्ष्य केले. यानंतर पाकिस्तानकडून भारतावर ड्रोनने हल्ला करण्यात आला. पाकिस्तानी सैन्य सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे आणि नियंत्रण रेषेवर गोळीबार करत आहे, ज्याला भारतीय सैन्य जोरदार प्रत्युत्तर देत आहे.