पिंपरी – चिकन, मटनची दुकाने सोमवार (दि. 20) पासून आठवड्यातील बुधवार, शुक्रवार आणि रविवार असे तीनच दिवस सुरू ठेवता येणार आहेत.
शहरातील एका चिकन विक्रेत्याला आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांनाही करोना विषाणूची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. सील केलेल्या भागातील दुकाने पुढील आदेश येईपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहेत. या भागातील पोलीस प्रशासनाने या आदेशाची अमंलबजावणी करावी, अशी सूचना अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी केली आहे.
नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शहरातील काही भागांमध्ये पुढील काही दिवस नागरिकांच्या हालचालीवर, बाहेर फिरण्यावर बारीक लक्ष ठेवण्यात येणार आहे. चिकण विक्रेत्याला करोनाची लागण झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.