Junnar News : शरदचंद्र पतसंस्थेची 33 वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न

जांबूत : शरदचंद्र नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, राजुरी (ता. जुन्नर) येथील ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. २४ रोजी श्रीराम मंगल कार्यालय, राजुरी येथे संस्थेचे अध्यक्ष एम. डी. घंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेत सभासदांना २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी १० टक्के लाभांश आणि दीपावली भेटवस्तू देऊन सण गोड करण्याची घोषणा अध्यक्ष एम. डी. घंगाळे यांनी केली. सभासद आणि खातेदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना संचालक मंडळाने समर्पक उत्तरे देऊन समाधानकारक माहिती प्रदान केली.
महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्रासह १२ शाखांद्वारे विस्तारलेल्या शरदचंद्र पतसंस्थेचा एकूण व्यवसाय ४४२ कोटींहून अधिक आहे. मार्च २०२५ अखेर १६,५७७ सभासदांनी संस्थेचे सभासदत्व स्वीकारले असून, २४५ कोटी २२ लाखांहून अधिकच्या ठेवी आणि १९७ कोटी ६२ लाखांहून अधिक कर्जवाटप संस्थेने केले आहे. पारदर्शक कारभारामुळे संस्थेला नेहमीच ऑडिट वर्ग “अ” प्राप्त झाला असून, यापूर्वी अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. शरदचंद्र गौरव पुरस्काराद्वारे सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करून संस्था सामाजिक बांधिलकी जपत आहे.
डिजिटल युगाला अनुसरून संस्था बँकिंग सुविधा, मनी ट्रान्स्फर, एसएमएस प्रणाली, वीजबिल स्वीकृती, सेफ लॉकर, NEFT/RTGS यांसह सभासदांना ३ लाखांचे अपघाती विमा संरक्षण प्रदान करते. संस्थेचे अध्यक्ष एम. डी. घंगाळे, उपाध्यक्ष राजेंद्र औटी, सेक्रेटरी दत्तात्रय गंधट, खजिनदार भिमाजी मालुसकर, संचालक जी. के. औटी, अनंतराव गटकळ, नरेंद्र गटकळ, तुळशीराम हाडवळे, प्रमोद पाटील, संजय पिंगळे, अशोक औटी, विवेक शेळके, संदीप औटी, संतोष चव्हाण, शालिनी हाडवळे, वैशाली औटी, शांता गवळी, अशोक कणसे, रज्जाक सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी शाम आर्विकर आणि वसुली अधिकारी महावीर व्हनुरे कार्यरत आहेत. संस्थेच्या राजुरी, आळेफाटा, नारायणगाव, आणे, पारगाव तर्फे मढ, निळवंडे, जांबूत, सावरगाव, भोसरी, घाटकोपर, वाशी तुर्भे, ओतूर येथे शाखा आहेत.
सभेला जुन्नर पंचायत समितीचे माजी सभापती दिपक आवटे, ग्राहक पंचायतचे प्रांत संघटनमंत्री बाळासाहेब औटी, समर्थ पॉलिटेक्निकचे विश्वस्थ वल्लभ शेळके महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे संचालक भास्कर बांगर, खरेदी-विक्री संघाचे संचालक लक्ष्मण घंगाळे, तुळशीराम भोईटे, एकनाथ शिंदे, राजुरीच्या सरपंच प्रिया हाडवळे, उपसरपंच ज्ञानेश्वर शेळके, माजी उपसरपंच संजय गवळी, नंदकुमार हाडवळे, भरत घंगाळे, गणेश दूध संस्थेचे चेअरमन सुभाष औटी, डी. बी. गटकळ, गोविंद औटी यांच्यासह सभासद, खातेदार आणि सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे प्रस्ताविक जी. के. औटी यांनी केले, सभावृत्तांत वाचन शाम आर्विकर यांनी केले, सूत्रसंचालन तुळशीराम हाडवळे यांनी केले, तर दिपक आवटे यांनी आभार मानले.





