ज्युनियर एनटीआरच्या ‘देवरा’ सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

Devara Movie| दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआर व जान्हवी कपूरची प्रमुख भूमिका असलेल्या ‘देवरा’ हा चित्रपट मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटातील गाण्याला देखील अनेकांची पसंती मिळाली. या चित्रपटाचा ट्रेलरही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी एक माहिती समोर आली आहे. या सिनेमात अभिनेत्री श्रुती मराठेची वर्णी लागली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिने याबद्दल माहिती दिली आहे.
अभिनेत्री श्रुती मराठेने इंस्टाग्रामवर डबिंग करतानाचा फोटो शेअर करत ती देवरामध्ये काम करत असल्याचे सांगितले आहे. तिने फोटो शेअर करत लिहिले की, डबिंग, देवरा सिनेमा. तिने हॅशटॅगमध्ये लिहिले की, हिंदी, तेलगू, देवरा. तिच्या या पोस्टवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत तिला शुभेच्छा देत आहेत. या प्रोजेक्टबद्दल जाणून घेण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. Devara Movie|
‘देवरा’ या चित्रपटात जान्हवी ज्युनियर एनटीआरसोबत सैफ आली खानही आहे. तो यात एका खलनायकाची भूमिका साकारत आहे. दरम्यान, चित्रपटाचे दिग्दर्शन कोराताला शिवा यांनी केले हा चित्रपट २७ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
श्रुती मराठेचा ‘अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’ हा सिनेमा काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला. त्यानंतर ती ‘गुलाबी’ या मराठी चित्रपटात देखील दिसणार आहे. यात श्रुतीसह अभिनेत्री अश्विनी भावे, मृणाल कुलकर्णी झळकणार आहे. श्रुतीने मराठी, तमिळ, कन्नड आणि हिंदी या चारही भाषेत तिनं काम केलं आहे. आता ती अभिनयाबरोबर निर्मिती क्षेत्रातही काम करत आहे. Devara Movie|
हेही वाचा:
काँग्रेसची जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार तयारी सुरू; राहुल गांधींची आज रामबन, अनंतनागमध्ये रॅली





