ज्युनिअर बच्चनच्या पाठीवर कौतुकाची थाप! बिग बी अमिताभ बच्चन यांनी अभिषेकचे भरभरून केले कौतुक

Posted by Amitabh Bachchan : हिंदी चित्रपटाचे महानायक अमिताभ बच्चन हे त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे नेहमी चर्चेत असतात. अशा काही पोस्ट अमिताभ करतात की ज्यामुळे पोस्ट पाहिल्यानंतर अनेक प्रश्न वाचणाऱ्यांच्या मनात तयार होत असतात. नुकतीच त्यांनी सोशल मीडियावरून एक पोस्ट शेअर केली आहे. पण ही पोस्ट मुलगा ज्युनिअर बच्चन अर्थात अभिषेक बच्चन याच्यासाठीची आहे.
अभिनेता अभिषेक बच्चन याचा कालीधर लापता नावाचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यामुळे बच्चन यांनी मुलालाबद्दल एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अमिताभ बच्चन यांनी अभिषेक बच्चनचे कौतुक केले आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांचे वडील हरिवंश राय बच्चन यांच्या एका ओळीने पोस्टची सुरुवात केली आहे.
T 5418 –
… and there is immense admiration for Abhishek ..
“मेरे बेटे, बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नहीं होंगे ; जो मेरे उत्तराधिकारी होंगे वो मेरे बेटे होंगे”
~हरिवंश राय बच्चन
my sons just because you are my sons shall not be my inheritors .. they that shall be my… pic.twitter.com/4hOyjOwczY— Amitabh Bachchan (@SrBachchan) June 21, 2025
“मेरे बेटे, बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नहीं होंगे ; जो मेरे उत्तराधिकारी होंगे वो मेरे बेटे होंगे” पुढे बच्चन यांनी लिहिले की, ‘त्यांनी चित्रपटांमध्ये कठीण भूमिका केल्या. त्यांनी अभिनय करण्याचे धाडस केले आणि स्वतःचे नाव कमावले. बच्चन यांनी अभिषेक बच्चनच्या आगामी ‘कालिधर लापता’ चित्रपटाला मीडिया प्लॅटफॉर्म X वरून पोस्ट करत पाठिंबा दिला आहे.
‘माझ्या प्रार्थना अभिषेकसोबत आहेत. तू वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका निवडतो आणि त्या यशस्वीपणे साकारतो, हे खूप छान आहे. तुला प्रेम आणि आशीर्वाद’. असे म्हणत अमिताभ बच्चन यांनी मुलगा अभिषेकची पाठ थोपटली आहे.
अभिषेक बच्चन ‘कालिधर लापता’ या चित्रपटात लीड रोलमध्ये असून एका स्मृती गमावलेल्या व्यक्तीची भूमिका अभिषेकने चित्रपटात साकारली आहे. हा चित्रपट कालिधर नावाच्या हरवलेल्या व्यक्तीची कथा सांगणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून, मधुमिता दिग्दर्शित हा चित्रपट ४ जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा : अमेरिकेच्या हल्ल्याने इराणचा उडाला भडका ; इस्रायलच्या १० शहरांवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव





