Satara : शंभूराज देसाई मंत्रिमंडळात पाटण तालुक्यात जल्लोष

कोयनानगर : महायुती सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार होऊन या मंत्रिमंडळात पाटण तालुक्याचे लोकप्रतिनिधी शंभूराज देसाई यांनी कॅबीनेट मंत्रीपदी पुन्हा अपेक्षेप्रमाणे शपथ घेतल्यानंतर पाटण तालुक्यात ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी व साखर पेढयाचे वाटप करुन कार्यकर्त्यानी जल्लोष साजरा केला.
विधानसभा निवडणुकीत पाटण विधानसभा मतदारसंघात आ. शंभूराज देसाई यांनी ३४, ८३२ मताधिक्याने एकतर्फी विजय मिळवला आहॆ. अडीच वर्षांपूर्वी महायुतीच्या सरकार मध्ये उत्पादन शुल्क या खात्याबरोबर सातारा व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री या पदावर प्रभावीपणे काम शंभूराज देसाई यांनी केले. पाटण विधानसभा मतदारसंघात छप्पर फाडके निधी आणून तालुक्यात विकासाचा डोंगर उभारला आहॆ.
नुकत्याच झालेल्याविधानसभा निवडणुकीत आ.शंभूराज देसाई यांनी विकासकामांच्या जोरावर उच्चांकी मताने विजय संपादन केला आहॆ. सत्तेवर आलेल्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी झाला या विस्तारात शिवसेनेकडून उच्चांकी मत घेणाऱ्या शंभूराज देसाई यांची कॅबीनेट मंत्रीपदी शपथ घेतली आहॆ.शंभूराज देसाई यांनी कॅबीनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पाटण तालुक्यात ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी फटाके पेढे साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला आहॆ.





