JPMorgan : जेपीमॉर्गनची संरक्षण क्षेत्रात एन्ट्री !
JPMorgan : जेमी डिमॉन यांचा ऑफबीट निर्णय : 10 अब्ज डॉलर्स करणार गुंतवणूक

JPMorgan : इराणसोबतच्या युद्धानंतर अमेरिकेला भेडसावणाऱ्या शस्त्रास्त्रांच्या तीव्र तुटवड्या पार्श्वभूमीवर, देशातील सर्वात मोठी बँक ‘जेपीमॉर्गन चेस’ आता थेट संरक्षण क्षेत्रात आपली मोठी ताकद पणाला लावणार आहे.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेमी डिमॉन यांनी अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि आर्थिक स्वावलंबनासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या कंपन्यांमध्ये स्वतःच्या भांडवलातील १० अब्ज डॉलर्स थेट गुंतवण्याची मोठी घोषणा केली आहे. या निधीचा विस्तार पुढे २० अब्ज डॉलर्स किंवा त्याहून अधिक करण्याचा डिमॉन यांचा मानस आहे.
अलाबामा येथील क्षेपणास्त्र कारखान्याच्या दौऱ्यावर असताना, डिमॉन यांना लष्करी साहित्य उत्पादक कंपनी ‘एल-३-हॅरिस’कडून भांडवलाच्या टंचाईमुळे टोमाहॉक आणि थाड क्षेपणास्त्रांसाठी रॉकेट मोटर्स बनवण्यात येणाऱ्या अडचणी समजल्या. (JPMorgan)
सरकारी खरेदी प्रक्रियेतील दिरंगाई आणि निधीच्या कमतरतेमुळे कंपन्यांना मोठा साठा तयार करून ठेवता येत नाही, हे स्पष्ट झाल्यावर डिमॉन यांनी बँकेच्या पारंपारिक चौकटीबाहेर जाऊन थेट गुंतवणुकीचा निर्णय घेतला. (JPMorgan)
या ऐतिहासिक धोरणांतर्गत, जेपीमॉर्गन आता केवळ कर्ज किंवा सल्ला देण्यापुरती मर्यादित न राहता, थेट संरक्षण कंपन्यांचे शेअर्स खरेदी करेल. ही रणनीती अधिक जोखमीची असली, तरी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.
याशिवाय, बँकेने २०३५ पर्यंत संरक्षण, राष्ट्रीय सुरक्षा आणि ऊर्जा क्षेत्रातील सौद्यांसाठी १.५ ट्रिलियन डॉलर्सचे पारंपारिक कर्ज व वित्तपुरवठा करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. पेंटागॉन आणि ऊर्जा विभागासोबत बँकर्सच्या साप्ताहिक बैठकाही सुरू झाल्या आहेत. (JPMorgan)
टॉड कॉम्ब्स अन् जेफ बेझोस… (JPMorgan)
सुमारे १० अब्ज डॉलर्सचा हा विशेष निधी चालवण्यासाठी बर्कशायर हॅथवेचे प्रसिद्ध गुंतवणूक व्यवस्थापक टॉड कॉम्ब्स यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बँकेने आधीच आयडाहोमधील सोन्याच्या खाणीत आणि सॅन दिएगोमधील एआय-संचलित लढाऊ ड्रोन उत्पादक कंपनीत गुंतवणूक केली आहे.

JPMorgan : जेपीमॉर्गनची संरक्षण क्षेत्रात एन्ट्री !
तसेच, उत्पादन क्षेत्राचे ऑटोमेशन आणि एआय तंत्रज्ञानासाठी १०० अब्ज डॉलर्स उभारू पाहणारे ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्याशीही जेपीमॉर्गनची भागीदारीबाबत चर्चा सुरू आहे. हा नवीन उपक्रम वॉल स्ट्रीटवरील १९८० च्या दशकातील ‘मर्चंट बँकिंग’ची आठवण करून देतो. जेपीमॉर्गनचे हे पाऊल लष्करी उत्पादन वाढवण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या उद्दिष्टांशी तंतोतंत जुळणारे आहे.




