Josh Tongue WTC : जोश टंगचे तुफान! पाकिस्तानची दाणादाण उडवत रचला विक्रम; WTC 2025-27 मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच गोलंदाज
Josh Tongue WTC : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोश टंगने आपल्या भेदक माऱ्याने धुमाकूळ घातला.

Josh Tongue become 1st bowler to reach 50 wickets in the WTC 2025-27 cycle : इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोश टंगने (Josh Tongue) आपल्या भेदक माऱ्याने धुमाकूळ घातला. टंगने अवघ्या ९.१ षटकांत ४६ धावा देऊन पाकिस्तानच्या निम्मा संघाला (५ विकेट्स) तंबूत धाडले. या धडाकेबाज कामगिरीसह जोश टंगने चालू जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC 2025-27) सायकलमध्ये ५० विकेट्सचा टप्पा गाठणारा जगातील पहिला गोलंदाज बनण्याचा ऐतिहासिक मान मिळवला आहे.
मिचेल स्टार्क आणि मोहम्मद सिराजला टाकले मागे –
जोश टंगने चालू डब्ल्यूटीसी सायकलमधील १० कसोटी सामन्यांत ५० विकेट्स घेत अव्वल स्थान पटकावले आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क ४८ विकेट्ससह दुसऱ्या, तर भारताचा मोहम्मद सिराज ४१ विकेट्ससह तिसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स ३९ विकेट्ससह चौथ्या आणि वेस्ट इंडिजचा जेडन सील्स ३५ विकेट्ससह पाचव्या क्रमांकावर आहे. या सायकलमध्ये टंगने आतापर्यंत तब्बल तीन वेळा एका डावात ५ किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.
डब्ल्यूटीसी २०२५-२७ मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज:
- जोश टंग (इंग्लंड): ५० विकेट्स*
- मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया): ४८ विकेट्स
- मोहम्मद सिराज (भारत): ४१ विकेट्स
- बेन स्टोक्स (इंग्लंड): ३९ विकेट्स
- जेडन सील्स (वेस्ट इंडिज): ३५ विकेट्स
स्टुअर्ट ब्रॉडच्या ६९ विकेट्सच्या महाविक्रमावर नजर!
Precision, seam movement, and relentless pressure. 🎯
Ollie Robinson (5-fer) and Josh Tongue (5-fer) shared all 10 wickets to completely dismantle the Pakistani batting order. pic.twitter.com/2ZlYc3aen5
— Hemant Bhavsar (@hemantbhavsar86) August 20, 2026
एकाच डब्ल्यूटीसी सायकलमध्ये ५० विकेट्स घेणारा जोश टंग हा इंग्लंडचा सहावा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी स्टुअर्ट ब्रॉड (६९ विकेट्स, २०१९-२१), जेम्स अँडरसन (५८ विकेट्स), ऑली रॉबिन्सन (५३ विकेट्स), गस ॲटकिन्सन (५२ विकेट्स) आणि ख्रिस वोक्स (५१ विकेट्स) यांनी ही कामगिरी केली होती. चालू सायकलमध्ये अजून अनेक सामने शिल्लक असल्याने जोश टंगकडे स्टुअर्ट ब्रॉडचा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढण्याची सुवर्णसंधी आहे. दरम्यान, एकाच डब्ल्यूटीसी सायकलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा जागतिक विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायनच्या (८८ विकेट्स, २०२१-२३) नावावर आहे.





