‘जॉली एलएलबी 3’च्या शूटिंगला सुरुवात; अक्षय कुमार आणि अर्शद वारसी दिसणार एकत्र

Jolly LLB 3 Start Shooting| ‘जॉली एलएलबी’ च्या मोठ्या यशानंतर आता ‘जॉली एलएलबी 3′ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अखेर या चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात झाली आहे. अभिनेता अक्षय कुमार व अरशद वारसी आता तिसऱ्या भागात एकत्र पाहायला मिळणार आहे. अक्षय कुमार आणि अर्शद वारसीने इन्स्टाग्रामवर एक प्रोमो शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये त्यांनी चित्रपटाच्या शुटिंगबद्दल माहिती दिली आहे.
या व्हिडिओमध्ये अर्शद आणि अक्षय दोघेही खरा जॉली आणि खोटा जॉली कोण? यावर भांडताना दिसत आहे. तर शेवटी सौरभ शुक्ला ‘जॉली एल. एल. बी. ३ च्या शूटिंगला सुरुवात’ असे सांगताना दिसत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या भागातील वकील आता तिसऱ्या भागात आपल्याला एकत्र दिसणार आहे. चित्रपटाच्या शुटिंगला अजमेरमध्ये सुरूवात झाली आहे.
View this post on Instagram
दरम्यान, अक्षयने व्हिडीओला “आता ओरिजिनल कोण आणि डुप्लिकेट कोण हे तर माहीत नाही, पण आता हा प्रवास जॉली होणार आहे हे नक्की. आमच्यासोबत राहा, जय महाकाल!” असे कॅप्शन दिले आहे.
दरम्यान, 2013 साली प्रदर्शित झालेल्या पहिल्या ‘जॉली एलएलबी’ चित्रपटात अरशद वारसी झळकला होता. तर ‘जॉली एलएलबी 2′ 2017 मध्ये रिलीज झाला होता. मात्र अद्याप ‘जॉली एलएलबी 3’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली नाही.





