काझिंद संयुक्त लष्करी सरावाला आजपासून सुरुवात
Updated On:

नवी दिल्ली : भारत आणि कझाकस्तान दरम्यानच्या काझिंद-2024 या आठव्या संयुक्त लष्करी सरावाला आज उत्तराखंडमधील औली येथील सूर्य परदेशी प्रशिक्षण केंद्रात सुरुवात झाली. हा लष्करी सराव आजपासून 13 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. वर्ष २०१६ पासून दर वर्षी दोन्ही देशांच्या लष्करांच्या सहकार्याने काझिंद नामक संयुक्त लष्करी सराव आयोजित करण्यात येतो.
गेल्या वर्षी ३० ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर या कालावधीत कझाकस्तान येथील ओटार येथे हा संयुक्त सराव पार पडला होता. लष्कराच्या कुमाऊ रेजिमेंटतर्फे इतर शस्त्रास्त्रे आणि सेवा यांसह भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या तुकडीत भारतीय सशस्त्र दलांतील १२० जवानांसोबत भारतीय हवाई दलातील जवानांचा देखील समावेश आहे. कझाकस्तानच्या पथकाचे प्रतिनिधित्व मुख्यतः पायदळ आणि वायुदलाची पथके करतील.





