Chess Tournament : रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत ‘भुवन शितोळे’ला संयुक्त आघाडी…

Sports In Pune :- बुद्धिबळ क्रीडा ट्रस्ट यांच्या तर्फे आयोजित व पुणे जिल्हा बुद्बिबळ सर्कल (पीडीसीसी) यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या १३ व्या स्वर्गीय प्रो. वामनराव आलुरकर मेमोरियल रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत पाचव्या फेरीअखेर भुवन शितोळे, वेदांत काळे, कशिश जैन या खेळाडूंनी ४.५ गुणांसह आघाडी प्राप्त केली.
प्रभात रोड येथील सिम्बायोसिस स्पोर्ट्स सेंटर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत अ (१००० ते १२४९ रेटेड खेळाडू) गटात भुवन शितोळेने वेदांत काळे बरोबरीत रोखले. तर, रितिक रायने कविश लिमयेचा पराभव करून ४.५ गुण मिळवले. ब (१२५० आणि त्यावरील रेटेड खेळाडू) गटात कशिश जैनने आदित्य जोशीचा पराभव करून ४.५ गुण मिळवले.
किरण पंडितरावने नमीत चव्हाणला पराभुत करून ४.५ गुणांची कमाई केली. याआधी स्पर्धेचे उदघाटन छत्रपती पुरस्कार विजेत्या डब्ल्यूआयएम मृणालिनी कुंटे-औरंगाबादकर, सुनील मोकल आणि प्राची मोकल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टचे ट्रस्टी प्रकाश कुंटे व रवींद्र अकोलकर, चीफ आरबीटर आयए विनिता श्रोत्री आदी उपस्थित होते.



