Jasprit Bumrah Discovery : सलग १२ यॉर्कर अन् एका फोन कॉलवर मुंबईमध्ये एन्ट्री! बुमराह नावाचा ‘हिरा’ कसा सापडला? जॉन राईट यांनी सांगितला किस्सा
Jasprit Bumrah Discovery : बुमराहला घडवण्यात मोठा वाटा असलेल्या जॉन राईट यांनी पत्रकार सुनंदन लेले आणि अमोल कऱ्हाडकर यांच्याशी संवाद साधताना त्याच्या शोधाची आठवण सांगितली.

John Wright recalls discovering Jasprit Bumrah in 2013 : न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या जसप्रीत बुमराहचा माजी भारतीय प्रशिक्षक जॉन राईट यांच्यासोबतचा फोटो नुकताच व्हायरल झाला. बुमराहला घडवण्यात मोठा वाटा असलेल्या राईट यांनी पत्रकार सुनंदन लेले आणि अमोल कऱ्हाडकर यांच्याशी संवाद साधताना त्याच्या शोधाची आठवण सांगितली. २०१३ मध्ये मुंबई इंडियन्सचे टॅलेंट स्काऊट असताना गुजरातमध्ये सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत मुंबईविरुद्धच्या सामन्यात त्यांनी बुमराहला पहिल्यांदा पाहिलं.
सलग बारा यॉर्कर चेंडूंनी वेधलं लक्ष – (Jasprit Bumrah Discovery)
मुंबई सहज विजय मिळवेल अशी स्थिती असताना गुजरातकडून एक शिडशिडीत युवा गोलंदाज आला. त्याच्या वेगळ्या अॅक्शनने आणि वेगाने राईट थक्क झाले. ते म्हणाले, “त्याने सहाही चेंडू यॉर्कर टाकले. मी थांबून त्याचे पुढचे षटकही पाहिले. पुन्हा त्याने सहाही शिस्तबद्ध यॉर्कर टाकून फलंदाजांची भंबेरी उडवली.” या कौशल्याने प्रभावित होत त्यांनी गुजरातचा कर्णधार पार्थिव पटेलची भेट घेतली.
पार्थिव पटेलचा सल्ला अन् मुंबई इंडियन्समध्ये एन्ट्री – (Jasprit Bumrah Discovery)
The story of unearthing Jasprit Bumrah and the reason behind his longevity despite an unusual action — from the man who did it, John Wright.
The former India coach, who along with Sourav Ganguly as captain, formed a winning partnership at the turn of the century, speaks to a select group of reporters at the Willows Club in Christchurch.@johnwright15 @shamik100 @IDFCFIRSTBank
— RevSportz Global (@RevSportzGlobal) November 26, 2026
पार्थिव पटेलच्या क्रिकेट ज्ञानाचा आणि पारखी नजरेचा आदर करणाऱ्या राईट यांनी त्या मुलाबद्दल विचारताच पार्थिवने त्याचे नाव ‘बूम’ सांगत सकारात्मक अभिप्राय दिला. त्यानंतर राईट यांनी तात्काळ मुंबई इंडियन्सचे व्यवस्थापक राहुल संघवी यांना सांगितलं, “या मुलाची अॅक्शन, वेग आणि अचूकता विलक्षण आहे.” त्यांच्या शिफारशीनंतर पुढच्याच दिवशी सकाळी बुमराह थेट मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल झाला.
सराव सत्रात सचिन तेंडुलकरही झाला थक्क – (Jasprit Bumrah Discovery)
When I captured this moment, I had no idea it would hit #1 trending on X & Insta
Only thing i knew was Both of these men deserve every bit of love, appreciation, and praise coming their way.
Thank you for everything, John Wright. Thank you, Jasprit Bumrah. https://t.co/s4WSeruhHa— Rohit Juglan (@rohitjuglan) November 9, 2026
२०१३ मध्ये बुमराह केवळ दोनच सामने खेळला, पण बंगळुरूमधील सराव सत्रात त्याने सर्वांची मनं जिंकली. राईट यांनी त्याला थेट सचिन तेंडुलकरला गोलंदाजी करण्यास सांगितलं. क्रिकेटच्या दैवतासमोरही त्याने अचूक मारा केला. सराव संपताच सचिनने नाव विचारल्यावर राईट यांनी ‘जसप्रीत बुमराह-बूम’ सांगितले. त्यावर सचिन म्हणाला, “जॉन, या मुलाचा सामना करणे कठीण आहे.” हे ऐकून राईट भारावून गेले.
संधीचं सोनं करत बनला नंबर एक गोलंदाज –
From spotting a raw talent in 2013 to witnessing a global superstar in 2026! ⏳💙
Some cricket journeys come full circle, and this one is special. Jasprit Bumrah and John Wright – 13 years apart, but the connection remains! 🙌🏏
#JaspritBumrah #JohnWright #MumbaiIndians #IPL https://t.co/krCZ981fi9
— SportsTiger (@The_SportsTiger) November 9, 2026
बुमराहच्या यशाचे कौतुक करताना जॉन राईट म्हणाले, “स्काऊट खेळाडूची निवड करून संधी देतो, पण कामगिरीत सातत्य राखणे त्याच्या हातात असतं. जसप्रीतने मिळालेल्या संधीचं सोनं केलं.” मुंबई आणि भारतीय संघातील अनेक प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्याने आपल्या भात्यात नवी अस्त्रे जोडली. तो हुशार, विनम्र आणि शिकण्यास तत्पर असल्यानेच आज जगातील नंबर एक गोलंदाज बनला आहे.





