John Bolton on Trump: “ट्रम्प यांनी परिस्थितीचा चुकीचा…” ; इराण युद्धावरून अमेरिकेच्या माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराने ट्रम्प यांना फटकारले
John Bolton on Trump: अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इराण धोरणावर तीव्र टीका केली आहे.

John Bolton on Trump: अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इराण धोरणावर तीव्र टीका केली आहे. त्यांनी, इराणसोबत सुरू असलेल्या युद्धात ट्रम्प यांनी परिस्थितीचा चुकीचा अंदाज लावला आणि कदाचित त्यांना वाटले असेल की, ते व्हेनेझुएलामध्ये अमेरिकेने पूर्वी केलेल्या प्रयत्नांप्रमाणेच इराणमध्ये लवकरच सत्ता बदल घडवून आणू शकतात.” असे म्हटले.
बोल्टन यांनी पुढे बोलताना,”जर ट्रम्पला असे वाटत असेल तर ते आधीही चुकीचे होते आणि आजही चुकीचे आहेत. ” असे त्यांनी म्हटले. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत बोल्टन यांनी ट्रम्पवर अनेकदा नियोजनाशिवाय मोठे निर्णय घेत असल्याचा आरोप केला.
त्यांच्या मते, “ट्रम्पचे निर्णय कोणत्याही धोरणात्मक विचारसरणीवर आधारित नसून ते आवेगाने घेतले जातात.” बोल्टन म्हणाले की, लष्करी कारवायांसारखे मोठे निर्णय व्यापक नियोजन आणि कसून तयारीची आवश्यकता असते, परंतु ट्रम्प सामान्यतः असे करत नाहीत.” असे म्हणत त्यांनी ट्रम्प यांच्यावर आरोप केले.
तेलाच्या पुरवठ्यावर युद्धाचा परिणाम John Bolton on Trump:
इराणसोबत सुरू असलेले युद्ध आता दुसऱ्या आठवड्यात प्रवेश करत आहे आणि आखाती प्रदेशात क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले सुरू आहेत. याचा परिणाम जगाच्या ऊर्जा पुरवठ्यावरही होत आहे.
दरम्यान, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेल वाहतूक धोक्यात आहे. बोल्टन म्हणाले की, “हा धोका आधीच स्पष्ट होता आणि व्हाईट हाऊसने त्यासाठी तयारी करायला हवी होती.”
अमेरिकन सैन्याचे कौतुक केले
ट्रम्पवर टीका करताना, बोल्टन यांनी अमेरिकन सैन्याच्या कृतींचेही कौतुक केले. त्यांनी म्हटले की लष्करी कारवाईदरम्यान इराणच्या अनेक लष्करी क्षमता कमकुवत झाल्या आणि त्यांच्या कमांड आणि कम्युनिकेशन सिस्टमचे गंभीर नुकसान झाले.
हा निर्णय नेतान्याहूचा नाही तर ट्रम्पचा होता John Bolton on Trump:
बोल्टन असेही म्हणाले की, बेंजामिन नेतान्याहू यांनी अमेरिकेला युद्धात ढकलले असे म्हणणे चुकीचे आहे. त्यांच्या मते, हा निर्णय पूर्णपणे ट्रम्पचा होता. इराणसोबतचे युद्ध २८ फेब्रुवारी रोजी सुरू झाले.
अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराणी लष्करी आणि आण्विक सुविधांवर हवाई हल्ले सुरू केले. त्यानंतर इराणने प्रत्युत्तरात्मक क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले सुरू केले, ज्यामुळे मध्य पूर्वेतील तणाव वाढला आणि अलिकडच्या काळात ते सर्वात घातक युद्धात रूपांतरित झाले.






