John Abraham : जॉन अब्राहमची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील! मुंबईतील वांद्रे येथे खरेदी केला ‘इतक्या’ कोटींचा आलिशान बंगला
John Abraham : मुंबईतील हा परिसर उद्योगपती, बॉलिवूड सेलिब्रिटी आणि उच्चभ्रू व्यक्तींच्या आलिशान निवासस्थानांसाठी ओळखला जातो.

John Abraham : बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमने (John Abraham ) मुंबईतील सर्वाधिक प्रतिष्ठित भागांपैकी एक असलेल्या वांद्रे पश्चिममध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. तब्बल ८४ कोटी रुपयांचा आलिशान बंगला त्याने खरेदी केला आहे.
या व्यवहारामुळे जॉनच्या लक्झरी रिअल इस्टेट पोर्टफोलिओमध्ये आणखी एका महागड्या मालमत्तेची भर पडली असून, त्याची सध्या बॉलिवूड आणि रिअल इस्टेट क्षेत्रात जोरदार चर्चा रंगली आहे.
रिअल इस्टेट कन्सल्टन्सी फर्म ‘लियासेस फोरस’च्या माहितीनुसार, जॉनने सेंट मार्टिन रोड, वांद्रा पश्चिम येथे ही प्रीमियम फ्रीहोल्ड मालमत्ता विकत घेतली आहे.
मुंबईतील हा परिसर उद्योगपती, बॉलिवूड सेलिब्रिटी आणि उच्चभ्रू व्यक्तींच्या आलिशान निवासस्थानांसाठी ओळखला जातो. १४ जुलै २०२६ रोजी हा व्यवहार पूर्ण झाला.
या व्यवहारासाठी सुमारे १,०१७.६० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या प्लॉटवर उभारलेल्या या मालमत्तेत ३१.५० चौरस मीटरचे आउटहाऊस आणि १९३.१२ चौरस मीटर बांधकाम क्षेत्र असलेला प्रशस्त बंगला आहे. या व्यवहारासाठी जॉन अब्राहमने ५ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क आणि ३० हजार रुपयांचे नोंदणी शुल्क भरले आहे.
देश-विदेशात कोट्यवधींच्या मालमत्ता (John Abraham)
जॉन अब्राहमकडे आधीपासूनच अनेक लक्झरी प्रॉपर्टी आहेत. मुंबईतील त्याने खरेदी केलेले काही अपार्टमेंट्स भाड्याने दिले असल्याची माहिती आहे. तसेच अमेरिकेतील लॉस एंजेलिस आणि लंडन येथेही जॉनच्या आलिशान मालमत्ता असल्याचं विविध माध्यमांच्या वृत्तांत म्हटलं आहे.
आगामी सिनेमाची उत्सुकता (John Abraham )
कामाच्या आघाडीवर पाहता, जॉन अब्राहम लवकरच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमात झळकणार आहे. याशिवाय त्याच्या लोकप्रिय ‘फोर्स’ फ्रँचायझीचा पुढील भाग ‘फोर्स ३’मध्ये तो पुन्हा एकदा एसीपी यशवर्धन सिंहच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा २०२७ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता असून चाहत्यांमध्ये त्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.





