Vaibhav Archer Rivalry : “आता हिशोब बरोबर झालाय, पण…!” जोफ्रा आर्चरने चौथ्या सामन्यापूर्वी वैभव सूर्यवंशीला दिलं ‘ओपन चॅलेंजट
Vaibhav Archer Rivalry : आयपीएल २०२६ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून एकत्र खेळणारे हे दोन्ही खेळाडू आंतरराष्ट्रीय मंचावर आमनेसामने आले, तेव्हा त्यांच्यात कोणतीही मैत्री दिसली नाही.

Vaibhav Sooryavanshi vs Jofra Archer IND vs ENG T20I Series 2026 : भारत आणि इंग्लंड यांच्यातील क्रिकेट मालिका सध्या एका नव्या आणि रंजक मैदानी वैरामुळे गाजत आहे. भारतीय संघाचा १५ वर्षांचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी आणि इंग्लंडचा एक्सप्रेस गतीचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर यांच्यात मैदानात सध्या जोरदार ठिणगी उडाली आहे. आयपीएल २०२६ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून एकत्र खेळणारे हे दोन्ही खेळाडू आंतरराष्ट्रीय मंचावर आमनेसामने आले, तेव्हा त्यांच्यात कोणतीही मैत्री दिसली नाही. नवख्या वैभवने मँचेस्टरमधील पदार्पणाच्या सामन्यात आर्चरला षटकार ठोकला होता, तर आता नॉटिंघममधील तिसऱ्या टी-२० सामन्यातही त्याने हीच पुनरावृत्ती केली.
पहिल्याच चेंडूवर षटकार; पण आर्चरने १४५ kmph च्या गतीने घेतला बदला –
नॉटिंघमच्या ट्रेंट ब्रिज मैदानावर २०२ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना वैभव सूर्यवंशीचा बेधडक अंदाज कायम होता. त्याने डावाच्या सुरुवातीलाच जोफ्रा आर्चरच्या पहिल्याच चेंडूवर गगनभेदी षटकार ठोकला. यानंतर त्याने जोश टंगलाही लेग साईडवर एक मोठा षटकार मारला. मात्र, वैभव मोठी खेळी खेळणार असे वाटत असतानाच जोफ्रा आर्चरने आपला बदला पूर्ण केला. आर्चरने ताशी १४५ किमी वेगाने एक भेदक शॉर्ट पिच चेंडू टाकला, जो वैभवच्या ग्लव्ह्सला लागून विकेटकीपर जोस बटलरच्या हातात विसावला आणि वैभव ५ चेंडूंत १३ धावा करून बाद झाला.
Back to Back Sixes by Vaibhav Sooryavanshi
– 1st Six on the last ball of the over of Jofra Archer
– 2nd on the first ball he faced Josh Tongue
Hope Vaibhav plays for at least 30 balls in the next match, he’ll definitely hit a big score 🔥pic.twitter.com/lhzTZo80Ef
— Infino Sports (@infinosports) July 8, 2026
सामन्यानंतर जोफ्रा आर्चरचा युवा रायव्हलला कडक संदेश –
Vaibhav Sooryavanshi’s real destructive mode comes out when he’s challenged, and Jofra Archer did exactly that in the 3rd T20I. He’ll be well prepared for this challenge if he gets the chance in the 4th T20I.
Total carnage could be loading in the powerplay, especially against…
— CricInformer (@CricInformer) July 8, 2026
या सामन्यात २९ धावांत ३ विकेट्स घेत ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरलेल्या जोफ्रा आर्चरने सामन्यानंतर वैभव सूर्यवंशीबाबत कौतुक आणि इशारा वजा संदेश दिला. आर्चर म्हणाला, “सध्या आमचा वैयक्तिक स्कोर १-१ असा बरोबरीत सुटला आहे, पण मालिकेत अजून दोन सामने बाकी आहेत. जो सर्वोत्तम असेल तोच जिंकेल.” आर्चरला वैभवच्या क्षमतेची चांगलीच कल्पना आहे; कारण आयपीएल २०२६ मध्ये याच १५ वर्षांच्या मुलाने ७२ षटकार आणि ७७६ धावा कुटून ‘ऑरेंज कॅप’ व ‘मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेयर’चा किताब जिंकला होता.
भारताचा ७६ धावांवर खुर्दा; इंग्लंडची मालिका अजेय –
🎙️Reporter 🗣️ : Where exactly do you bowl to Vaibhav Sooryavanshi to get him out?”
🎙️Jofra Archer 🗣️ : I’ll tell you after the IPL
Meanwhile Jofra Archer after the IPL 💀pic.twitter.com/jIT5Gz6hzw
— Indian Cricket (@IPL2025Auction) July 8, 2026
सामन्याचा विचार केला तर इंग्लंडने भारताचा १२५ धावांनी एकतर्फी पराभव केला. इंग्लंडने फिल सॉल्टच्या ७० धावांच्या जोरावर २० षटकांत ७ बाद २०१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताचा संपूर्ण डाव ११.४ षटकांत अवघ्या ७६ धावांवर आटोपला. इंग्लंडकडून जोश टंगने ४ तर आर्चरने ३ विकेट्स घेतल्या. या पराभवासह भारतीय संघ ५ सामन्यांच्या मालिकेत २-० ने पिछाडीवर पडला आहे.





