IND vs ENG : जो रुटचा ऐतिहासिक पराक्रम! डब्ल्यूटीसीमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला जगातील पहिलाच खेळाडू
IND vs ENG Joe Root Century : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्यांत इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूटने शतक झळकावत इतिहास रचला आहे. तो घरच्या मैदानावर 24 कसोटी शतके करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. याबाबतीत त्याने रिकी पॉन्टिंग, जॅक कॅलिस आणि महेला जयवर्धने या तिघांना मागे टाकले आहे. या तिघांनी पण आपापल्या मायदेशात २३ कसोटी शतके झळकावली आहेत. यासह रुटने अनेक विक्रम मोडले आहेत.
जो रूटने रचला नवा इतिहास –
जो रूटने अवघ्या 137 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याने हॅरी ब्रूकसह शानदार भागीदारी करत इंग्लंडचा डाव सावरला आणि संघाला मजबूत स्थितीत आणले. हॅरी ब्रूकच्या शतकानंतर जो रूटनेही शतक ठोकत भारतीय संघाला बॅकफूटवर ढकलले. रूटने कसोटी क्रिकेटमधील आपले 39वे शतक साजरे केले, तर भारताविरुद्ध हे त्याचे 16वे कसोटी शतक आहे. गेल्या पाच वर्षांत रूटने शतकांची मालिका रचली असून, हे त्याचे 22वे शतक आहे.
Joe Root dons the headband in tribute to Graham Thorpe after his century at The Oval ❤️ pic.twitter.com/wadHqALDNX
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) August 3, 2025
यासह त्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) मध्ये 6000 धावांचा टप्पा गाठतही इतिहास रचला आहे. हा पराक्रम करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. रूटने आपल्या 69व्या डब्ल्यूटीसी सामन्यात ही ऐतिहासिक कामगिरी केली. पहिल्या डावात 29 धावांवर बाद झालेल्या रूटला 6000 धावांचा टप्पा गाठण्यासाठी दुसऱ्या डावात 25 धावांची गरज होती. त्याने 40व्या षटकात भारताचा गोलंदाज मोहम्मद सिराजच्या चेंडूवर चौकार मारत हा टप्पा पूर्ण केला. त्या वेळी रूट 24 धावांवर खेळत होता.
हेही वाचा – IND vs ENG : क्रॉली-डकेट जोडीने भारताविरुद्ध रचला इतिहास, मोडला सर्वात मोठा विक्रम!
मायदेशात रूटचे भारताविरुद्ध वर्चस्व –
The headband straight on ❤️
“England’s present No. 4 will never forget England’s previous No. 4, that meant so much to him.”
🤝 @IGcom pic.twitter.com/MnPzz4vQmQ
— England Cricket (@englandcricket) August 3, 2025
जो रूटने भारताविरुद्ध घरच्या मैदानावर 20 कसोटी सामन्यांत तब्बल 10 शतके ठोकली आहेत. घरच्या मैदानावर एकाच संघाविरुद्ध इतकी शतके ठोकणारा तो एकमेव फलंदाज आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज डॉन ब्रॅडमन आहे, ज्याने इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर आठ शतके झळकावली होती.





