पिंपरी | छावा मराठा युवा महासंघाकडून डांगे चौकात जोडे मारो आंदोलन

पिंपरी (प्रतिनिधी) – सार्वजनिक बांधकाम विभागाने निकृष्ट आणि दर्जाहीन केलेले बांधकांमामुळे मालवण येथील, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कोसळून विटंबना झाली.
त्यास सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून रवींद्र चव्हाण जबाबदार असून, त्यांच्या प्रतिमेेस जोडे मारत यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करुन त्यांचे मंत्रिपद काढून घ्यावं अशी मागणी डांगे चौक थेरगाव येथे छावाच्या जोडे मारो आंदोलनातून धनाजी पाटील यांनी केली.
अखंड हिंदुस्तानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे ४ डिसेंबर २०२३ रोजी नौदल दिनानिमित्त मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उद्घाटन केले. हा पुतळा २६ ऑगस्ट रोजी अवघ्या आठ महिन्यात कोसळला.
पाच कोटीहून अधिक खर्च करुनही महाराजांचे पूर्णाकृती स्मारक कोसळणे अत्यंत दुर्दैवी आणि संताप जनक आहे. ज्या मुर्तिकारांना मोठ्या मुर्त्या बनवण्याचा कोणताच अनुभव नसताना आपटे याला काम देण्याचे कारण काय? असे प्रश्न उद्भवत आहे.
या आंदोलनात मानव कांबळे, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनाजी येळकर पाटील, संजय जाधव, किरण पाटील, अरुण पवार, हेमलता लांडे, निलम खुर्द, सुशांत जाधव, विष्णू बिरादार, विलास भोइने, गणेश सरकटे, गजानन बिरादार, अंगद जाधव, महेंद्र शिंदे, सतीश किशोर उपस्थित होते.





