एक कोटी तरुणांना नोकरी, उद्योगांसाठी मोफत जमीन; बिहार निवडणुकीपूर्वी CM नितीशकुमार यांची मोठी घोषणा

CM Nitish Kumar | बिहार निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्या अनुषंगाने बिहारमधील राजकीय पक्ष जनतेला आपल्या बाजूने वळवण्यासाठी अनेक योजना राबवत आहेत. याच दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यातील तरुणांसाठी मोठी घोषणा केली आहे. पुढील ५ वर्षांत तब्बल १ कोटी तरुणांना नोकऱ्या व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
एवढेच नाही, तर त्यांनी बिहारमध्ये उद्योग उभारणाऱ्या उद्योजकांना दिलासा देत आर्थिक मदत करण्याचे वचन देखील दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्य सरकारच्या या उपक्रमाचा उद्देश बिहारमध्ये उद्योगांना चालना देणे, बिहारमधील युवकांना स्वावलंबी बनवणे आणि युवकांना जास्तीत जास्त रोजगार देणे आहे. CM Nitish Kumar |
नितीशकुमार यांचे ट्विट
मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर लिहिले की, “२०२० मध्ये सात निश्चय-२ अंतर्गत दिलेल्या आश्वासनानुसार आमच्या सरकारने ५० लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या आणि विविध रोजगार उपलब्ध करून दिले आहेत. आता पुढील टप्प्यात हे लक्ष्य वाढवत आम्ही १ कोटी रोजगार उपलब्ध करून देणार आहोत. राज्यात उद्योग उभारणी आणि स्वयंरोजगार वाढवण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत आहे. उद्योजकांना बिहारमध्ये उद्योग स्थापन करण्यासाठी आकर्षित करण्याकरिता विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.” CM Nitish Kumar |
2020 में सात निश्चय-2 के तहत की गई घोषणा के क्रम में हमारी सरकार ने 50 लाख युवाओं को सरकारी नौकरी एवं रोजगार देने के लक्ष्य को पूरा कर लिया है। अब हमारी सरकार ने अगले 5 वर्षों में 1 करोड़ युवाओं को नौकरी एवं रोजगार देने का लक्ष्य रखा है। राज्य में उद्योग लगाने और स्वरोजगार करने…
— Nitish Kumar (@NitishKumar) August 16, 2025
1 कोटी युवकांना मिळणार रोजगार
बिहार सरकार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे युवकांना वचन देत सांगितले की, आमच्या सरकारने पुढील 5 वर्षांत 1 कोटी युवकांना नोकरी आणि रोजगार देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. याशिवाय, 2020 मध्ये सात निश्चय-2 योजनेअंतर्गत केलेल्या घोषणेनुसार आमच्या सरकारने 50 लाख युवकांना सरकारी नोकरी आणि रोजगार देण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.
उद्योग उभारणाऱ्यांना मिळणार आर्थिक सुविधा
राज्यात रोजगार वाढवण्यासाठी सरकार उद्योग उभारणाऱ्यांना आणि स्वयंरोजगार करणाऱ्यांना अनेक प्रकारच्या सुविधा देऊन प्रोत्साहित करत आहे. पुढे त्यांनी सांगितले की, खासगी क्षेत्रांना बिहारमध्ये उद्योग उभारण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी सरकारने विशेष आर्थिक पॅकेज देण्याचा निर्णय घेतला आहे. बिहार सरकारच्या या निर्णयामुळे राज्य आर्थिकदृष्ट्या मजबूत होईल आणि युवकांना रोजगारही मिळेल.
या पॅकेजमध्ये नेमकं काय ?
- उद्योजकांना राज्यात उद्योग उभारण्यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये जमिनीची व्यवस्था केली जाईल आणि जे उद्योग अधिक लोकांना रोजगार देतील, त्यांना मोफत जमीन दिली जाईल. उद्योगासाठी जिल्हानिहाय जमिनीची सोय केली जाईल.
- भांडवली अनुदान, व्याज अनुदान आणि GST साठी देण्यात येणारी प्रोत्साहन रक्कम दुप्पट केली जाईल. याशिवाय, उद्योग उभारण्यासाठी वाटप केलेल्या जमिनीशी संबंधित वाद संपवले जातील. या सर्व सुविधा पुढील 6 महिन्यांत उद्योग उभारणाऱ्या उद्योजकांना दिल्या जातील.
- पुढील काही वर्षांत बिहारमध्ये केवळ सरकारी नोकऱ्याच नव्हे, तर खासगी क्षेत्रातील उद्योग, स्टार्टअप्स आणि स्वयंरोजगाराच्या असंख्य संधी निर्माण केल्या जाणार आहेत. यासाठी स्वतंत्र आणि सविस्तर अधिसूचना सरकारकडून लवकरच जारी करण्यात येणार आहे.
- याशिवाय सरकारतर्फे आणखी काही तरतुदीही केल्या गेल्या आहेत, ज्यामुळे राज्यात उद्योग उभारणाऱ्या उद्योजकांना मोठी मदत मिळेल. यासंदर्भातील संपूर्ण माहिती स्वतंत्रपणे जारी केली जाईल.
हेही वाचा :





