JOB Vacancy: 10वी उत्तीर्णांसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनीत नोकरीची संधी
Updated On:

पुणे – महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनीत दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी आहे. इलेक्ट्रिशयन पदासाठी कंपनीकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी दहावी पास आणि NCTVTचा कोर्स केलेला असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 ऑक्टोबर 2022 आहे. तसेच या पदासाठी वयोमर्यादा ही 18 ते 38 वर्ष असून एकूण 38 पदांसाठी ही भरती होणार आहे. पुणे हे नोकरीचे ठिकाण असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी www.mahatransco.in या संकेतस्थळावर जावून अधिकृत जाहिरात पाहावी आणि ऑनलाईन अप्लाय करायचे आहे. अधिक माहिती वरील वेबसाईटवर उपलब्ध आहे.





