Pimpri : इंद्रायणी महाविद्यालयात नोकरी मेळावा
Updated On:

तळेगाव दाभाडे : येथील इंद्रायणी महाविद्यालयात मोंडेलीज इंटरनॅशनल, सेंटम वर्क स्कील यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य नोकरी मेळाव्याचे आयोजन इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे आणि सचिव चंद्रकांत शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या उपक्रमात विविध नामांकित १५ ते २० कंपन्यांनी सहभाग नोंदवला व विद्यार्थ्यांना करिअरच्या नव्या संधी उपलब्ध करून दिल्या.
या नोकरी मेळाव्यात सुमारे ३०० ते ४०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा आढावा घेण्यासाठी कंपन्यांच्या एचआर अधिकाऱ्यांनी थेट मुलाखती घेतल्या.
यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्यांनुसार नोकऱ्यांसाठी संधी देण्यात आली आणि काही विद्यार्थ्यांना त्वरित रुजू होण्यासाठी निवड प्रमाणपत्र (ऑफर लेटर) देण्यात आले.





