मुंबई – मुंबई महापालिका अर्थात BMC मध्ये 1178 जागांसाठी मेगा भरती केली जाणार आहे. याबाबतची जाहिरात देखील महापालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. BMC एक्झिक्युटिव्ह असिस्टंटसाठी ही भरती होणार असल्याचे समजते.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २७ मे २०२३ रोजी सुरू झाली असून १६ जून २०२३ पर्यंत सुरू राहील. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता महत्त्वपूर्ण ठरणार आहे.भारतीबाबतची सविस्तर माहिती बीएमसीच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे.
अर्ज केल्यानंतर ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल. त्यातून पुढे योग्य उमेदवाराची निवड केली जाईल. बीएमसीमध्ये सहाय्यक कार्यकारी म्हणून काम करणाऱ्या उमेदवारांना २१,७०० ते ६९,१०० रुपये वेतन मिळणार आहे.
अर्ज फी
यासाठीच्या अर्जासोबत फी देखील भरावी लागणार आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना एक हजार रुपये फी असणार आहे. तर मागास प्रवर्गाचा भाग असलेले उमेदवार ९०० रुपये भरुन अर्ज करु शकतात. भरतीशी निगडीत अपडेटेड माहिती वेबसाइटच्या मदतीने मिळवता येतील.
सविस्तर माहितीसाठी बीएमसीच्या अधिकृत साईटला भेट द्या
https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlrn