पुणे | पुरंदरमधील 261 युवकांना नोकरीची संधी

पुणे, (प्रतिनिधी) – वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य नोकरी महोत्सवामधून पुरंदर तालुक्यातील 261 युवकांना नोकरीची संधी उपलब्ध झाली असून रोजगार मेळाव्यातुन शेकडो युवकांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे, असे वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी सांगितले.
हिवरे (ता पुरंदर) येथील प्रतिष्ठानच्या गुरुवर्य नारायण महाराज विद्यालयामध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या नोकरी महोत्सवाचे उद्घाटन पुणे जिल्हा भाजपा दक्षिण आध्यक्ष वासुदेव काळे यांच्या हस्ते झाले त्या वेळी जालिंदर कामठे बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार अशोक टेकवडे, गंगाराम जगदाळे, राहुल शेवाळे,
निलेश जगताप, मारुती किंडरे, संजय जवळकर, सचिन लंबाते, गिरीश जगताप, संदीप हरपळे, पांडुरंग देवकर, संतोष जगताप, प्रकाश भामे, भानूकाका जगताप, अॅड. श्रीकांत ताम्हणे, सुदर्शन कुदळे, रामदास कुदळे, सागर कुदळे, शब्बीर शेख, उत्तम जगताप, नंदू गायकवाड, रमेश कुदळे, गणेश मोरे, सचिन पठारे, बाबू नहालवे, राजू पाटील, विजय वायदंडे, राजेंद्र साळुंखे आदी उपस्थित होते.
जालिंदर कामठे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सामाजिक हित म्हणून पुरंदर तालुक्यातील हजारो युवक युवतींना रोजगाराच्या संधी आम्ही उपलब्ध करून दिल्या व यापुढेही पुढील पाच वर्षांमध्ये 25 हजार युवक युवतींना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे त्यांनी नमूद केले.
मागील 25वर्षांपासून सामाजिक कार्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला असून हजारो युवक युवतींना रोजगाराच्या संधी त्यांच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या आहेत. या पुढे ही त्यांच्या माध्यमातून अशाच प्रकारचे सामाजिक कार्य घडत राहील.
जालिंदर कामठे यांच्या माध्यमातून मागील पाच वर्षांमध्ये पुरंदर तालुक्यामधील जवळपास 2 हजार युवक युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. – वासुदेव काळे, अध्यक्ष, पुणे जिल्हा दक्षिण,





