#jnu: पदवीदान सोहळ्यानंतर विद्यार्थ्यांनी नोंदवला निषेध
Updated On:

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 116 वा पदवीप्रदान समांरभ आज पार पडला. पदवीदान सोहळ्यानंतर विद्यार्थ्यांनी जेएनयू विद्यापीठातील रविवारी झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध केला.
यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग काेश्यारी हाेते. यावेळी एक लाख नऊ हजार ७,३० पदव्या विद्यार्थ्यंना प्रदान करण्यात आल्या.
विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर निदर्शने केली. यावेळी फुले शाहू आंबेडकर कृती समितीने राज्यपालाला निवेदन देत सीएए, एनआरसी लागू न करण्याची मागणी केली.
दरम्यान रविवारी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थी आणि शिक्षकावर भ्याड हल्ला झाला होता. यात जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आयशा घोष जखमी झाल्या होत्या.





