‘जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

‘जेएनयू: जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी’ (JNU: Jahangir National University) चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. चित्रपटात विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये मार्क्सवादी-बहुजनवादी विचारधारा विरोधात हिंदुत्ववादी विचारसरणी यांच्यातील संघर्ष दिसणार आहे. त्यामुळे हा चित्रपट वादात अडकण्याची शक्यता आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ बोडके प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे.
कधी होणार चित्रपट रिलीज?
“जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी” चित्रपट सेन्सर बोर्डाच्या मंजुरीनंतर 21 जून 2024 रोजी रिलीज होणार आहे.
‘या’ कलाकारांनी चित्रपटात साकारली महत्वाची भूमिका
चित्रपटात अभिनेत्री उर्वशी रौतेला, पियुष मिश्रा, रवी किशन, सिद्धार्थ बोडके, विजय राज, रश्मी देसाई, अतुल पांडे आणि शिवज्योती राजपूत आदी कलाकारांनी महत्वाची भूमिका साकारली आहे.





