जेएनयू हल्ला प्रकरण: आयेषी घोष हिच्यासह 19 जणांवर एफआयआर दाखल
Updated On:

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी आपली कारवाई सुरु केली आहे. इथल्या विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या बुरखाधारी लोकांना शोधण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी मारहाण झालेल्या जेएनयूच्या विद्यार्थी संघाची अध्यक्ष आयेषी घोष हिच्यासह 19 जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सर्वर रुमची तोडफोड आणि सुरक्षा रक्षकांना मारहाण प्रकरणी आयेषीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चार जानेवारी रोजी जेएनयूच्या सर्वर रुममध्ये तोडफोड आणि सुरक्षा रक्षकांच्या वाहनांवर हल्ला केल्याच्या तसेच सुरक्षा रक्षकांना मारहाण केल्याच्या आरोपांखाली आयेषी घोष हिच्यासह 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेएनयू प्रशासनाने याबाबत दिल्ली पोलिसांकडे तक्रार दिली होती.




