भाजपच्या उमेदवारांची सहावी यादी जाहीर, जाणून घ्या कोणाला मिळाले ‘तिकीट’

J&K Elections 2024 । जम्मू आणि काश्मीरमधील तिकिटावरून पक्षातील भांडणाच्या दरम्यान, भारतीय जनता पक्षाने (भाजप) आज रविवारी (8 सप्टेंबर 2024) आपल्या उमेदवारांची सहावी यादीही प्रसिद्ध केली. या यादीत 10 उमेदवारांची नावे समाविष्ट आहेत. पक्षाने यापूर्वीच आणखी 5 याद्या जाहीर केल्या आहे. मात्र, प्रत्येक यादीनंतर पक्षांतर्गत नाराजी पसरली आहे. अनेक ज्येष्ठ नेत्यांनी तिकीट न मिळाल्याने नाराज होऊन पक्ष सोडला आहे. तिकीट न मिळाल्याने आंदोलने सातत्याने होत आहेत.
भाजपने जाहीर केलेल्या या यादीतील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे 10 पैकी पाच उमेदवार मुस्लिम आहे. सर्वाधिक चर्चेत असलेली जागा कठुआची आहे, जिथून भाजपने डॉ. भारतभूषण यांना उमेदवारी दिली आहे. मुस्लिम उमेदवारांमध्ये पक्षाने कर्नाह मतदारसंघातून मोहम्मद इद्रिस कर्नाही, हंदवाडा मतदारसंघातून गुलाम मोहम्मद मीर, सोनवारी मतदारसंघातून अब्दुल रशीद खान, बांदीपोरा मतदारसंघातून नासिर अहमद लोन आणि गुरेझ मतदारसंघातून फकीर मोहम्मद खान यांना संधी दिली आहे.
J&K Elections 2024 । तिकीट कोणाला कुठून मिळाले?
करनाह – मोहम्मद इदरीस करनाही
हंदवाड़ा – गुलाम मोहम्मद मीर
सोनावरी-अब्दुल रशीद खान
बांदीपोरा -नासिर अहमद लोन
गुरेज -फकीर मोहम्मद खान
कठुआ-डॉ. भरत भूषण
ऊधमपुर पूर्व-आरएस पठानिया
बिश्नाह-राजीव भगत
बाहु-विक्रम रंधावा
मढ़ -सुरिंद भगत
J&K Elections 2024 । तीन टप्प्यात मतदान होणार
जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील निवडणूक १८ सप्टेंबर रोजी होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी २५ सप्टेंबरला तर तिसऱ्या टप्प्यासाठी १ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. याआधी ४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार होती, मात्र हरियाणात निवडणुकीच्या तारखा बदलल्यानंतर मतमोजणीची तारीखही बदलली.





