Jiyaa Shankar Breakup Rumours: ब्रेकअपच्या चर्चांना जिया शंकरने दिला पूर्णविराम! मंगेतर करणसोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत म्हणाली, ‘अफवांमध्ये अजिबात तथ्य नाही’
Jiyaa Shankar Breakup Rumours जिया शंकर आणि करण धनक यांच्या नात्याबद्दल गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर वेगवेगळे दावे केले जात होते. जियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही पोस्ट आणि रील्स शेअर केल्या होत्या. या पोस्टमध्ये ब्रेकअप, प्रेमात मिळालेला धोका आणि भावनिक त्रास अशा विषयांचा उल्लेख होता. त्यामुळे चाहत्यांमध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा सुरू झाली.

Jiyaa Shankar Breakup Rumours: ‘बिग बॉस ओटीटी’मुळे प्रसिद्धी मिळवणारी अभिनेत्री जिया शंकर सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपासून जिया आणि तिचा मंगेतर करण धनक यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू होत्या. दोघांचे ब्रेकअप झाल्याच्याही बातम्या समोर येत होत्या. मात्र, आता स्वतः जियाने या चर्चांवर मौन सोडले आहे. मंगेतर करणसोबतचे काही रोमँटिक फोटो शेअर करत तिने ब्रेकअपच्या बातम्यांमध्ये अजिबात तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
नेमकं काय घडलं होतं?
जिया शंकर आणि करण धनक यांच्या नात्याबद्दल गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर वेगवेगळे दावे केले जात होते. जियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही पोस्ट आणि रील्स शेअर केल्या होत्या. या पोस्टमध्ये ब्रेकअप, प्रेमात मिळालेला धोका आणि भावनिक त्रास अशा विषयांचा उल्लेख होता. त्यामुळे चाहत्यांमध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा सुरू झाली.
त्यातच जियाने इन्स्टाग्रामवरून मंगेतर करणला अनफॉलो केल्याचेही समोर आले. यामुळे दोघांच्या नात्यात सर्व काही ठीक नसल्याचा अंदाज चाहत्यांनी व्यक्त केला. काही दिवसांतच त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सोशल मीडियावर वाढू लागल्या. मात्र, या चर्चांवर जियाने आता स्वतः प्रतिक्रिया दिली आहे.
करणसोबतचे रोमँटिक फोटो केले शेअर
ब्रेकअपच्या अफवांदरम्यान जियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर करणसोबतचे काही सुंदर आणि रोमँटिक फोटो शेअर केले. या फोटोंसोबत तिने एक लांबलचक पोस्टही लिहिली. नातं, प्रेम, एकमेकांना समजून घेणं आणि आयुष्यातील चढ-उतार याबद्दल तिने आपले विचार मांडले. विशेष म्हणजे, जियाने पुन्हा एकदा करणला इन्स्टाग्रामवर फॉलो केले आहे. त्यामुळे दोघांच्या नात्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांना तिने आपल्या पोस्टमधून उत्तर दिल्याचे दिसते.
View this post on Instagram
‘आम्ही परफेक्ट नाही, फक्त एकमेकांना समजून घेत आहोत’
जियाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, एकत्र राहायला शिकताना आयुष्य नेहमीच सोपे नसते. हे एखाद्या बॉलिवूड चित्रपटासारखे नसते. अनेक जोडपी एकमेकांवर खूप प्रेम करतात, पण त्यांच्यात कधीकधी भांडणेदेखील होतात. प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते. त्यामुळे एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ द्यावा लागतो.
आम्ही परिपूर्ण नाही, तर इतरांप्रमाणेच सामान्य माणसं आहोत. आम्हाला एकमेकांवर प्रेम झाले आणि आम्ही एकमेकांची निवड केली, अशा भावना तिने व्यक्त केल्या. तसेच आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत आणि या नात्यातून पुढे जाताना एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत, असेही तिने सांगितले.
‘ब्रेकअपच्या अफवांमध्ये अजिबात तथ्य नाही’
जियाने आपल्या पोस्टमध्ये ब्रेकअपच्या चर्चांवर स्पष्ट शब्दांत उत्तर दिले. ती म्हणाली की, आतापासून सोशल मीडियावर काहीही शेअर करताना अधिक काळजी घेणार आहे. तिच्या पोस्टमुळे कोणताही गैरसमज किंवा निराधार अफवा पसरू नयेत, याची ती काळजी घेईल.
तसेच तिच्या मंगेतराबद्दल आणि त्यांच्या नात्याबद्दल जे काही बोलले जात आहे, त्यात अजिबात तथ्य नाही, असे तिने स्पष्ट केले. चला, आता प्रेम आणि माणुसकीच्या भावनेने पुढे जाऊया, अशी विनंतीही तिने चाहत्यांना केली. प्रत्येकाला आयुष्यात प्रेम आणि मनःशांती मिळावी, अशी शुभेच्छाही तिने दिल्या.
कोण आहे करण धनक?
जिया शंकर ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘मेरी हानिकारक बीवी’, ‘प्यार तूने क्या किया’ आणि ‘लाल इश्क’ यांसारख्या मालिकांमध्ये तिने काम केले आहे. याशिवाय ती ‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या पर्वातही सहभागी झाली होती. या कार्यक्रमामुळे तिच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली.
दुसरीकडे, करण धनक हा अमेरिकेत राहणारा उद्योजक आहे. जिया आणि करण यांनी यावर्षी ऑगस्ट महिन्यात साखरपुडा केला होता. आता जियाच्या स्पष्टीकरणानंतर त्यांच्या नात्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांकडूनही प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.





