Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाड बिष्णोई गँगच्या टार्गेटवर; फोनवरून दिली धमकी

Jitendra Awhad | Bishnoi Gang : बॉलीवूड अभिनेता सलामान खान याच्या घरावर नुकताच गोळीबार झाला होता. त्यानंतर मुंबई पोलीस तातडीने कामाला लागले. या प्रकरणाचा छडा लावला. त्याचवेळी या गोळीबार घटनेची जबाबदारी सोशल मीडियाच्या माध्यमातून बिष्णोई गँगने घेतली. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली.
मात्र, त्यानंतर आता लगेचच या गँगने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना धमकी दिली आहे. बिष्णोई गँगने फोनवरुन धमकी दिल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यानी दिली आहे. । Jitendra Awhad | Bishnoi Gang
रोहित गोदरा नावाच्या व्यक्तीने जितेंद्र आव्हान यांना फोन केला आणि जितेंद्र आव्हाड यांच्याकडे पैशांची मागणी केली. रोहित गोदरा हा लॉरेन्स बिष्णोई गँगचा असल्याची माहिती आहे. पैसे दिले नाही तर तयार राहा असा इशारा धमकी देणाऱ्याने दिल्याचंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
धमकीचा फोन ऑस्ट्रेलियावरुन आल्याची माहिती आहे. यामुळे बिष्णोई गँगच्या रडारवर महाराष्ट्रातील राजकीय नेते आहेत का अशी भीती व्यक्त केली जात आहे. तसेच आता हळूहळू बिष्णोई गँग महाराष्ट्रात सक्रिय होतेय का? असंही बोललं जात आहे.
लॉरेंस बिश्नोई हा पंजाबमधील गँगस्टर आहे. त्याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल झाले आहे. पंजाबी गायक सिधू मूस वाला याची हत्या या गँगने केली. त्यानंतर त्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. । Jitendra Awhad | Bishnoi Gang
या गँगमधील दोघांनी मागील आठवड्यात सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये पाच राऊंड फायर केल्या होत्या. ही घटना चर्चेत असतानाच या गँगने जितेंद्र आव्हाड यांना देखील धमकी दिली आहे.
अनमोल बिश्नोईने गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली-
सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी अनमोल बिश्नोई नावाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून स्वीकारण्यात आली आहे. ‘तुला आमची ताकद समजावी यासाठी हे केलं आहे. तुला ही शेवटचा इशारा आहे.
यानंतर रिकाम्या घरावर गोळ्या झाडणार नाही’, असे या पोस्टमध्ये लिहिले आहे. मात्र हे अकाउंट फेसबुक वर सर्च केलं जाऊ शकत नाही. अकाउंटबाबत रिस्ट्रीक्शन्स आहेत. त्यामुळे पोलीस अधिकारी याची सत्यता पडताळून पाहत आहेत. । Jitendra Awhad | Bishnoi Gang





