गोळीबार प्रकरणांवरून जितेंद्र आव्हाड यांची जहरी टीका,’हतबल सरकार उघड्या डोळ्यांनी सारं काही पाहतंय.’

abhishek ghosalkar दहिसर येथील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर बेछूट गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. घोसाळकर यांच्यावर मॉरिस नोरोन्हा या इसमाने पाच गोळ्या झाडल्या. यापैकी तीन गोळ्या घोसाळकर यांना लागल्या असून त्यांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. घोसाळकर यांच्यावर दहिसर येथील करुणा रुग्णालयात उपचार सुरु होते.अशात आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मात्र याप्रकरणी राज्य सरकारवर खोचक टीका केली. सरकारने आता मागेल त्याला ‘बुलेट प्रूफ जॅकेट’ ही अभिनव योजना सुरू करावी, अशी सूचना आव्हाड यांनी दिली आहे.
महाराष्ट्र सरकारची अभिनव योजना
मागेल त्याला *बुलेट प्रूफ जॅकेट*— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 8, 2024
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये पुढे लिहिले आहे की,’महाराष्ट्रात लागोपाठ उघडपणे गोळीबाराच्या घटना घडणं, ही अतिशय गंभीर बाब आहे. ‘सागर’ बंगल्यावर बसलेल्या गृहमंत्र्यांचं महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष आहे की नाही असा प्रश्न पडतो. सरकार कुणाचंही असो पुरोगामी महाराष्ट्राची वाटचाल युपी/बिहारच्या दिशेने होणं ही इथल्या प्रत्येकासाठी शरमेची बाब आहे. जिथे राजकीय नेत्यांवर उघडपणे गोळीबार होतोय तिथे जनतेच्या सुरक्षेची काय गॅरंटी असणार..?’ असा प्रश उपस्थित केला आहे.
महाराष्ट्र सरकारची अभिनव योजना
मागेल त्याला *बुलेट प्रूफ जॅकेट*— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 8, 2024
त्यांनी पुढे ट्विट केले आहे की,’महाराष्ट्राचा बिहार झाला, असे म्हणण्यात आता काहीच अर्थ उरला नाही. कारण, महाराष्ट्राने बिहारला खूप मागे सोडलं आहे. गुंडांनी जणू काही महाराष्ट्र आपल्या मुठीत बंदिस्त करून टाकला आहे. हतबल सरकार उघड्या डोळ्यांनी सारं काही पाहतंय. पोलिसांची दहशतच संपली आहे. पोलीस दलात होणाऱ्या हस्तक्षेपामुळे पोलिसांनाही मर्यादा येत आहेत. पोलिसांवर फक्त विरोधकांना संपवण्याची जबाबदारी आहे; कायदा आणि सुव्यवस्था गेली खड्ड्यात ! दुर्देवं आहे, महाराष्ट्राचे ! इतक्या घटना घडूनही सरकारला लाज कशी वाटत नाही. जनता हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघतेय; जनतेमधील रोष वाढतोय. पण, लोकांचा जीव जाणे, याला सरकारच जबाबदार आहे, हे सरकारने लक्षात घ्यावे. परवा कल्याण, आज मुंबई… अजून काय माहित किती घटना घडणार आहेत? कधी पुणे, कधी ठाणे तर कधी मुंबई खुनांचा थरार सुरूच आहे.’ असेही लिहिले आहे.





