Jio vs Airtel: 200GB डेटा, 90 दिवस वैधता आणि अनलिमिटेड कॉलिंगसह बरचं काही… कोणाचा रिचार्ज प्लॅन बेस्ट ? वाचा

Best 90 Days Recharge Plans: टेलिकॉम कंपन्या Jio आणि Airtel ने आपल्या रिचार्ज प्लॅन्सच्या किंमतीत काही दिवसांपूर्वी वाढ केली आहे. मात्र, तुम्ही जर जास्त कालावधीसह येणारे रिचार्ज प्लॅन्स घेतल्यास कमी पैसे खर्च करावे लागू शकतात. Jio आणि Airtel कडे ग्राहकांसाठी 90 दिवसांच्या वैधतेसह येणारे काही शानदार प्लॅन्स उपलब्ध आहे. त्यामुळे एकदा रिचार्ज केल्यानंतर तीन महिन्यांपर्यंत कोणतेच रिचार्ज करण्याची गरज नाही. जिओ आणि एअरटेलच्या 90 दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या या प्लॅन्सविषयी जाणून घेऊयात.
जिओचा 899 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
जिओचा 899 रुपयांचा प्रीपेड प्लॅन 90 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड डॉलिंग आणि दररोज मोफत 100 एसएमएसचा फायदा मिळेल. याशिवाय, दररोज 2 जीबी डेटासह एकूण 20 जीबी अतिरिक्त डेटा दिला जातो. म्हणजेच प्लॅनमध्ये एकूण 200 जीबी डेटा दिला जातो.
2 जीबी डेटा समाप्त झाल्यानंतर 64Kbps च्या स्पीडने इंटरनेट वापरू शकता. याशिवाय, तुम्ही जर 5जी फोन वापरत असाल तर हाय-स्पीड इंटरनेटचा फायदा मिळतो. प्लॅनमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाउडचेही सबस्क्रिप्शन मिळते.
एअरटेलचा 929 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
एअरटेलच्या 90 दिवसांच्या प्लॅनसाठी तुम्हाला 929 रुपये खर्च करावे लागतील. या प्लॅनमध्ये 90 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 मोफत एसएमएसचा फायदा मिळतो. या प्लॅनमध्ये दररोज 1.5 जीबी डेटा दिला जातो. म्हणजेच 90 दिवसांसाठी एकूण 135जीबी डेटा दिला जातो.
अतिरिक्त फायद्यांमध्ये स्पॅम कॉल आणि एसएमएस अलर्ट, एअरटेल अॅप अॅक्सेस, अपोलो 24/7 सर्कल आणि फ्री हॅलोट्यून्सचा फायदा मिळतो.





